● 50 टक्के दंड भरण्याचे आदेश
सोलापूर : झेडपी येथील गाळेधारकांनी ताबडतोब 50 टक्के अनधिकृत दंडाची रक्कम पालिकेकडे जमा करावी तसेच उर्वरित रक्कम पुढील महिन्यात अदा करावी त्याचबरोबर खोकेधारकांना हे गाळे स्थलांतरासाठी येत्या तीन महिन्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषद आवारातील खोके हटविण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने काही दिवसापूर्वी हाती घेतली होती. दरम्यान मंत्र्यांचा फोन आल्याने ही कारवाई स्थगित झाल्याची मोठी चर्चा होती. त्यादिवशी महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे परगावी गेले होते. सोलापुरात आल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
दरम्यान जिल्हा परिषद आवारातील गाळेधारकांनी अनधिकृत दंडाची रक्कमही भरली नाही. त्यांना रस्त्यावर खोके थाटता येणार नाहीत. सन 2015 मध्येच कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला आहे. त्याच वेळी महापालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. त्यानंतर कारवाई हाती घेण्यात आली.
येथील खोकेधारकांनी जिल्हा परिषद प्रशासनाची चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. त्या ठिकाणी खाली पार्किंग व वर गाळे बांधण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे असे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद आवारातील खोकेधारकांना खोके स्थलांतरित करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली आहे. या खोकेधारकांनी ताबडतोब अनधिकृत दंडाची 50 रक्कम महापालिकेकडे जमा करावयाची आहे तसेच पुढील महिन्यात उर्वरित रक्कम अदा करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी . शिवशंकर यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ लाचखोर विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंत्यास अटक
सोलापूर : विद्युत डीपी चालू केल्यापासून ते आज पर्यंत विज वापरल्याची कोणतीही कारवाई न करण्याकरीता १५ हजार रुपये लाच घेणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सुमित गुलाबराव साबळे,(वय-२७,व्यवसाय नोकरी पद कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि. शाखा कार्यालय, सदाशिव नगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वतंत्र वैयक्तीक डी.पी बसविला असुन त्यास दि.२५ मार्च २०२२ रोजी म.रा.वि.वि.कं.लि. कार्यालय सदाशिव नगर यांचेकडुन चार्जिंग परवानगी मिळाली असुन तेव्हापासून तो डी.पी चालु झालेला होता.
परंतु त्यास कोणतेही मिटर बसविलेले नसल्याने तक्रारदार यांना त्या डीपीचेच आजपर्यंत कोणतेही विद्युत बिल आलेले नव्हते. परिणामी तक्रारदार यांचे डी.पी चा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला होता.
यातील आरोपी साबळे यांनी या विद्युत डीपीस नविन मिटर बसविण्यास सांगून मिटर बसविल्यानंतर यापुढे तक्रारदार यांना स्वतंत्र बिल येईल, असे सांगितले. डी.पी चालु केल्यापासून ते आज पर्यंत विज वापरल्याची कोणतीही कारवाई न करण्याकरीता १५ हजार रुपये लाचेची मागणी करुन ही लाच रक्कम स्विकारली असतांना आरोपी साबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.