□ महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा कारवाईचा झटका !
□ आता झोन कार्यालयांना कारवाईचा झटका !
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. ३ अंतर्गत दोन रस्त्यांच्या कामाच्या मटेरिअलमध्ये अनियमितता आढळून येण्याबरोबरच ही कामे निविदेच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे करून घेतले नसल्याच्या गैरवर्तनप्रकरणी आवेक्षक एन. एच. कोडक यांची एकवट मानधनावरील सेवा समाप्त करण्यात आली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आता झोन कार्यालयांना कारवाईचा झटका दिला आहे. Village Development Officer suspends service termination action against municipal inspector Kodak
महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी या कारवाईचे आदेश बुधवारी काढले आहेत. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक ३ येथे एन.एच.कोडक हे एकवट मानधनावर अवेक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे या कार्यालयाअंतर्गत विविध रस्त्यांचे काम करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. या विभागातील कमलनगर शेख घर ते दुधनी घर, पाटील घर ते गणपा घरापर्यंत अंतर्गत बिटुमेन डांबर रस्ता प्रदान करणे आणि बांधणे तसेच प्रवीण नगर पंचवटी नगर मित्र नगर दहिटणे रोड ते शेजल घरापर्यंत बिटुमेन डांबर रस्ता प्रदान करणे आणि बांधण्याचे काम झाले. या कामाचे त्रयस्त लेखापरिक्षणात मटेरिअलमध्ये अनियमितता झाल्याचे दिसून आले.
या रस्त्याचे काम निविदेच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे झालेले नाही. ही बाब गंभीर स्वरूपाची असून, कार्यालयीन कामकाजास बाधा पोहोचविणारी असल्याने आवेक्षक कोडक यांच्या कामकाजातील निष्काळजीपणामुळे त्यांची सेवा समाप्त का करण्यात येऊ नये? याचा खुलासा करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यित आली होती. या कारणे दाखवा नोटीशीस कोडक यांनी दोन्ही कामे चालू असताना त्रयस्त लेखापरिक्षण होऊन साईटवर ‘बाईंडर कन्टेन्ट आॅफ बिटूमेन’ चे प्रमाण कमी असल्याची सुचना दिली असती तर मक्तेदाराकडून त्याप्रमाणे काम करून घेता आले असते असा खुलासा केला आहे.
दरम्यान, काम चालू असताना व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी आवेक्षक कोडक यांचीच असताना ती त्यांनी वेळीच पार पाडली नसल्याने त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. या गैरवरतानामुळे थेट त्यांची मानधनावरील सेवा समाप्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ दोन ग्रामविकास अधिकारी निलंबित
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि रामपूर गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या गावच्या दोन्ही सरपंचांवर कारवाई चा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.
धोत्रीचे आय बी भोज व रामपूरचे ए एन कोळी असे निलंबित झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नाव आहे. भोज यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या 27 लाखाच्या रकमा परस्पर व सरपंच यांच्या सहीने काढून अपहार केल्याची तक्रार उपसरपंच महानंदा चौगुले यांनी केली होती. विस्तार अधिकाऱ्याने चौकशी करून अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना दिला होता.
या चौकशी अहवालात 16 लाखाचे मूल्यांकन जुळले आहे. भोज यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून सरपंच शांताबाई नारायण व्हटकर यांच्यावर कलम 39 खाली पद कमी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. कोळी यांच्याही अनेक तक्रारी होत्या.
कामकाजाकडे दुर्लक्ष, सभेला गैरहजर राहणे, बेकायदेशीर नोंदी घेणे, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने अपहार केला आहे. तसेच बीडीओ ची परवानगी न घेता पीएफएमएसद्वारे पेमेंट केली नाही. ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा बगले यांनी तक्रार केली होती. या प्रकरणात कोळी यांना निलंबित करण्यात आले आहे. सरपंच भागाबाई कृष्णात सोनटक्के यांच्यावर कलम 39 खाली पदावरून कमी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.