सोलापूर : सोलापूर शहरात सोमवारी कोरोनाचे 53 रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाचा कोरोनाने बळी गेला आहे. 53 रुग्णांची भर पडल्याने आता 5 हजार 951 कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत 392 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 5 हजार 951 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 468 तर महिला 2 हजार 483 रुग्णांचा समावेश आहे. आज मुरारजी पेठ भागातील धनराज गिरजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्यास 57 वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे.आतापर्यंत शहरांमध्ये 392 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 262 तर महिला 130 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 129 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 76 अहवाल निगेटिव्ह तर 53 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 48 हजार 455 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 42 हजार 379 अहवाल आहे. पॉझिटीव्ह 5 हजार 951 आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 34 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 525 आहे.