□ मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार; गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे समर्थक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. Let ‘Dhanushyaban’ come to us, even 5 out of 15 MLAs will not be left Milind Narvekar Gulabrao Patil
ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली त्यांना अग्नीडाग दिला तो चंपासिंह थापा आमच्याकडे आला. आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. फक्त धनुष्यबाण आमच्याकडे येऊ द्या यांच्याकडे 15 पैकी 5 आमदारही उरणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत आहेत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
शिवसेनेतील बंडानंतर मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीच्या दर्शनासाठी नार्वेकर यांच्या निवासस्थानी गेले होते. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत असल्याचं वक्तव्य केल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आमच्याकडे आला, आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, अशी चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
मागील 15 दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन दोनवेळा भेट घेतली होती. याचवेळी नार्वेकर हे शिवसेनेमधून फुटणार, अशी चर्चा राजकीय होती. शिवसेना कोणाची याबाबत संघर्ष तर सुरु असताना उद्धव ठाकर यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात जाणार का, याची चर्चा पाटील यांच्या विधानानंतर सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर शिवसेनेला सोडतील की, शिवसेनेला बळकटी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील याकडे सर्व राजकीय पक्षांच लक्ष असणार आहे.
शिवसेना ही आमची आहे, बाळासाहेब ठाकरे हे कोणाची एकट्याची मालमत्ता नाही. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही महाराष्ट्रात काम करत आहोत, असा दावा पाटील यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे.
काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी चर्चा सुरु झाली आहे.