सोलापूर – निंबर्गी (ता.दक्षिण सोलापूर) येथील आठवडा बाजारात काठीने मारहाण करून कल्लप्पा कोळी (वय ६० रा.निंबर्गी) यांच्या खून करणाऱ्या अप्पासाहेब पांडुरंग शिंगाडे (वय ३४ रा.सादेपूर ता.दक्षिण सोलापूर) याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपावरून ५ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.एच.पाटवदकर यांनी शुक्रवारी सुनावली. Solapur: Murder in Nimbargi; Five years of forced labor fraud on a charge of culpable homicide
९ जून २०१६ रोजी सकाळच्या सुमारास आरोपी शिंगाडे हा पत्नीसह आठवडा बाजारात आला होता. त्या दोघांनी मिळून बसप्पा पांढरे आणि भीमाशंकर चितापुरे यांना बघून तू साक्षीदार का झाला? असे म्हणत शिवीगाळ करीत त्यांना काठीने मारहाण केली. त्यावेळी झालेल्या मारहाणीत कल्लप्पा कोळी हे देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते २४ जून रोजी मयत झाले.
दरम्यान या घटनेची फिर्याद मयत कल्लप्पा कोळी यांचा मुलगा पद्मण्णा कोळी (रा. निंबर्गी) यांनी मंद्रूप पोलिसात दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन फौजदार विक्रांत हिंगे यांनी करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले.
मूळ फिर्यादीची साक्ष आणि सरकार पक्षाने मांडलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार तर आरोपी तर्फे अॅड. एस.एस. पुजारी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून फौजदार विजयकुमार जाधव यांनी सहकार्य केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ जागेची फसवणूक निवृत्त पोलीस अधिकारी मुजावर यांच्यासह तिघावर गुन्हा
सोलापूर – जागेची विभागणी झाली नसताना ती जागा परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझारच्या पोलिसांनी निवृत पोलीस अधिकारी महबूब अ.करीम मुजावर यांच्यासह तिघां विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात पुष्पा मदन चाकोते (वय ६४ रा. जोडभावी पेठ) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी रशीद हनीफ शेख (रा.मोदी खाना), महेबूब मुजावर आणि त्यांचा मुलगा डॉ. अस्लम मुजावर (रा.सदर बजार) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पुष्पा चाकोते यांनी सात रस्ता परिसरातील २०८ चौरस मीटर जागेपैकी १४९ चौरस मीटर जागा ही रशीद शेख यांच्याकडून ५ लाख ५० हजारास विकत घेतली होती.
उर्वरित ५८ चौरस मीटर या जागेची विभागणी झाली नसताना शेख यांनी ती जागा मुजावर यांना विकली. त्या जागेत गाळे बांधून ती जागा समीन काजी यांना भाडे तत्वावर हॉस्पिटलला दिली. त्या जागेत पुष्पा चाकोते यांना येण्यास प्रतिबंध करून धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.