Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील उद्या पंढरपुरात मुक्कामी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील उद्या पंढरपुरात मुक्कामी

Surajya Digital
Last updated: 2022/10/02 at 8:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ धडाकेबाज निर्णयाची जिल्ह्याला अपेक्षास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● … तर नवे पालकमंत्री ठरू शकतात रोषाचे धनी

□ धडाकेबाज निर्णयाची जिल्ह्याला अपेक्षा

 

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांचा जिल्ह्याचा पहिला दौरा निश्चित झाला आहे. पालकमंत्री झाल्यानंतर ते सोलापूरला पहिल्यांदाच येत आहेत. आल्या आल्या ते महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत श्री विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. उद्या सोमवारी (ता.3 ) पंढरपूर येथे मुक्कामी राहाणार असल्याचे वृत्त आहे. Solapur. Guardian Minister Radhakrishna Vikhe – Patil to stay in Pandharpur tomorrow, Solapur planning meeting

 

दुस-यादिवशी मंगळवारी सकाळी 9 वाजता ते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता त्यांचे सोलापूर येथे आगमन होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, चार हुतात्मा स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील, त्यानंतर  सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतील. पुढे नियोजन भवनात जनावरांच्या लम्पि आजाराबाबत आढावा बैठक नंतर मुख्यमंत्री सडक योजनेची आढावा बैठक घेणार आहेत. तसेच पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण व बैठक होणार आहे.

 

शिंदे गट प्रणीत शिवसेना आणि भाजप युतीमधील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असून पालकमंत्रीपदाचे सिंहासन सांभाळताना, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी धडाकेबाज विकासाभिमुख निर्णय घेणार की चलती का नाम गाडी याप्रमाणे लाल फितीमधील नोकरशहांकडून सुरू असलेला आहे तो कारभार पुढे रेटणारे धोरण राबवणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

अहमदनगरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे. दरम्यान उद्या सोमवारी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवली आहे. पालकमंत्र्यांविना जिल्ह्यातील विकास कामांचे जे निर्णय प्रलंबित राहिले आहेत, त्या निर्णयांना नव्या पालकमंत्र्यांकडून कितपत न्याय दिला जातो याकडे लक्ष लागून आहे.

राज्यामधील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीला ५२७ कोटींचा निधी मंजूर करून दिला होता. तथापि, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर करून दिलेल्या निधीवर कुरघोडी करून राजकारण करण्याचा प्रयत्न शिंदे – फडणवीस यांच्याकडून झाला. विद्यमान सरकारने ५२७ कोटींच्या निधीला ब्रेक लावला आहे. त्यातून विकास कामांना खो बसला आहे. हा अडलेला निधी विकास कामांसाठी मार्गस्थ होण्यासाठी नव्या पालकमंत्र्यांची सकारात्मक भूमिका असणे महत्त्वाचे मानले जात आहे.

● … तर नवे पालकमंत्री ठरू शकतात रोषाचे धनी

शिंदे – फडणवीस नेतृत्वाने राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या रूपाने गेटकेन पार्सल पालकमंत्री दिला आहे. जिल्ह्याच्या भूमिपुत्राला या पदावर संधी न दिल्यामुळे जिल्ह्यात या निवडीवरून नाराजी आहे. अशातच नव्या पालकमंत्र्यांनी वेगळ्या राजकारणातून विकास कामांना आडकाठी आणली, विशेष करून ५२७ कोटींच्या अडलेल्या निधीचा मार्ग मोकळा न केल्यास पालकमंत्री विखे-पाटील आणखीन रोषाचे धनी ठरू शकतात.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #GuardianMinister #RadhakrishnaVikhePatil #stay #Pandharpur #tomorrow #Solapur #planning #meeting, #सोलापूर #पालकमंत्री #राधाकृष्णविखेपाटील #उद्या #पंढरपुरात #मुक्कामी #सोलापूर #नियोजन #बैठक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आनंददादा…कोणता झेंडा घेऊ हाती ?
Next Article अक्कलकोट । चार तलवारीसह तरुणास अटक

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?