Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खासदार निंबाळकरांवर हल्ला करणार आरोपी पोलिसाच्या तावडीतून फरार; दहा महिन्यांपासून जेलमध्येच होता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीमहाराष्ट्रसोलापूर

खासदार निंबाळकरांवर हल्ला करणार आरोपी पोलिसाच्या तावडीतून फरार; दहा महिन्यांपासून जेलमध्येच होता

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 7:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

उस्मानाबाद / सोलापूर : विधानसभा निवडणूकीच्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा तरुण अजिंक्य टेकाळे हा उस्मानाबाद येथील जेलमधून फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील विधानसभा निवडणुका वेळी कळंब तालुक्यातील पाडोळी येथे अजिंक्य टेकाळे या तरुणाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. टेकाळे या तरुणावर गुन्हा दाखल होवून त्याची रवानगी धाराशिव येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान आज वैद्यकीय तपासणीसाठी त्यास नेत असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

१६ ऑक्टोबर  २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी पाडोळी येथे आले होते. तेव्हा अजिंक्य टेकाळे याने त्यांच्या हात-हातात घेत त्यांच्या पोटावर चाकूने वार केला होता. तेवढ्यात ओमराजे निंबाळकर यांनी पोटावर हात ठेऊन तो वार हातावर घेतला. त्यामुळे हातावर असलेल्या घड्याळावर चाकू लागला व ओमराजे बाल-बाल बचावले होते. त्यानंतर शिराढोन पोलिसांकडून या हल्लेखोराला अटक करण्यात आली होती. व या हल्लेखोरावर भांदवी 307 नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता.  गेल्या दहा महिन्यांपासून तो जेलमध्येच होता.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात तात्पुरते कारगृह उभारण्यात आले आहे. त्यात आरोपी अजिंक्य टेकाळे याला ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथून जिल्हा सामान्य रुग्णालयातून तात्पुरत्या जेलमध्ये परत आल्यानंतर जेल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला आहे. पोलिसांनी आता त्याचा शोध घेणे सुरू केलं आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #ओमराजे #खासदारनिंबाळकर #हल्ला #धाराशिव #आरोपी #फरार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात 53 कोरोना रूग्ण वाढले तर आज एक कोरोनाने मृत्यू
Next Article पद्मश्री, पद्मभूषण, फद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांचे अमेरिकेत निधन

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?