Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : बायकांना शिकवल्याच्या संशयाने शेजारी पेटले अन् जिवावर उठले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : बायकांना शिकवल्याच्या संशयाने शेजारी पेटले अन् जिवावर उठले

Surajya Digital
Last updated: 2022/10/04 at 10:32 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ चौघांनी चाकूने केले सपासप वार, विवाहित तरुण जागेवर ठारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)■ सर्व आरोपी घराला कुलूप लावून पसार■ रांगोळी तयार करणाऱ्या कुटुंबाची राखरांगोळी

□ चौघांनी चाकूने केले सपासप वार, विवाहित तरुण जागेवर ठार

 

सोलापूर : तुमच्या शिकवणीमुळे आमच्या बायका पंचायतीमध्ये घटस्फोट देऊन सोडून गेल्या. या कारणावरून घरात घुसून चाकू आणि लाथाबुक्क्याने मारून एका २५ वर्षीय विवाहित तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. Solapur: A married youth was killed after his neighbor set himself on fire on suspicion of teaching his wives

ही घटना तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील शिकलगार वस्तीत सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात जोडभावी पेठच्या पोलिसांनी मयताच्या घराशेजारी राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ आणि त्यांचे आईवडील अशा चौघांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत.

रवीसिंग सिसपालसिंग टाक (वय 25 रा. तळेहिप्परगा, फुटरस्ता, शिकलगार वस्ती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी सिमरन टाक (वय २०) ही देखील मारहाणीत जखमी झाली असून तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणात पोलिसांनी मयताच्या घरा शेजारी राहणारे विजयसिंग दीपकसिंग रबानी, त्याचा भाऊ अजयसिंग, वडील दीपकसिंग आणि आई चांदनीकौर रबानी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते सध्या फरार आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

तळे हिप्परगा येथील रस्त्या लगत शिकलगार वस्ती असून त्या ठिकाणी रवीसिंग टाक हा आपल्या कुंटूंबिया सोबत राहण्यास होता. तो रांगोळी तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करीत होता. त्याच्या घराशेजारीच त्यांच्या शिकलगार समाजातील विजयसिंह रबानी आणि त्याचे कुटुंबीय राहण्यास आहेत.

काही दिवसापूर्वी विजयसिंग आणि त्याचा भाऊ अजयसिंग यांच्या  बायका घर सोडून माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे दोघे रवीसिंग टाक यांच्या कुटुंबीयांवर चिडून होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विजयसिंग रबानी याच्यासोबत चौघेजण त्याच्या घरात घुसले आणि तुमच्या शिकवणीमुळे आमच्या बायका घर सोडून निघून गेल्या असे म्हणत भांडण करीत त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. चाकूने रवीसिंग टाक याच्या अंगावर चाकूने सपासप वार केले केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला बलवानसिंग (काका) यांनी त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले.  मात्र तो वाटेतच मरण पावला.

 

घटनेच्या वेळी भांडण सोडविताना मयताची पत्नी सिमरन कौर टाक ही देखील जखमी झाली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर रवीसिंग टाक याचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान या घटनेची फिर्याद मयताची आई बुंजाकौर टाक यांनी जोडभावी पेठ पोलिसात दाखल केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.

■ सर्व आरोपी घराला कुलूप लावून पसार

 

हा प्रकार कळल्यानंतर शासकीय रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. फरार झालेले आरोपी हे चाकू, विळी, आणि लोखंडाचे वस्तू तयार करतात. खून केल्यानंतर सर्व आरोपी घराला कुलूप लावून पसार झाले असे यावेळी सांगण्यात आले.

■ रांगोळी तयार करणाऱ्या कुटुंबाची राखरांगोळी

 

मयत रवीसिंग टाक याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. त्यापैकी दोघे भाऊ परगावी राहतात. या ठिकाणी त्यांचे कुंटूंबिय विविध रंगाची रांगोळी तयार करून त्याची विक्री करतात. पण या हत्येने रांगोळी करणाऱ्या कुटुंबाचीच राखरांगोळी झाल्याचे बोलले जात आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #married #youth #killed #neighbor #set #fire #onsuspicion #teaching #wives, #सोलापूर #बायका #शिकवण #संशय #पेटले #जिवावर #उठले #विवाहित #तरूण #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रिल बनवणं पडलं महागात, महिला कंडक्टर निलंबित, पहा रिल
Next Article शिवसेनेला झटका, संजय राऊतांचा ‘दसरा’ कोठडीतच !

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?