Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बापलेकीचा मृत्यू; पर्ल गार्डन समोर अपघात; सांगलीवरुन माहेरी आलेल्या मुलीचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बापलेकीचा मृत्यू; पर्ल गार्डन समोर अपघात; सांगलीवरुन माहेरी आलेल्या मुलीचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 9:27 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : गॅसची वाहतूक करणार्‍या ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हैदराबाद रस्त्यावरील पर्ल गार्डनजवळ झाला. यात बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नागनाथ लिंगप्पा गगनहळ्ळी (वय 66, रा. दमाणी शाळेजवळ, बुधवार पेठ, सोलापूर), सपना शितल विभूते (वय 36, रा. सांगली, सध्या रा. बुधवार पेठ) अशी मृत झालेल्या बापलेकीचे नाव आहे. अपघातानंतर नागरिकांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गॅस वाहतूक करणारा (एम.एच. 25 बी. 9977) हा ट्रक पाकणीवरून उस्मानाबादच्या दिशेने जात होता, त्याचवेळी गगनहळ्ळी एका महिलेसह (एम.एच.13 के. 0490) या दुचाकीवरून नागनाथ आणि त्यांची मुलगी सपना ही रूपाभवानी मंदिराकडून सोलापूरच्या दिशेने येत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पर्ल गार्डनजवळच्या दुभाजकासमोर ट्रकने गगनहळ्ळी यांच्या दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.  अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळपासच्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला जोडभावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सपना ही सांगलीची राहणारी असून ती कामानिमित्त माहेरी सोलापूरला आली होती.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #अपघात #धडकेत #बापलेकीचा #सांगली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पद्मश्री, पद्मभूषण, फद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांचे अमेरिकेत निधन
Next Article वाळू व्यवसायातील भागीदार असणारा पोलिस निलंबित; पोलिस आयुक्तांचा दणका

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?