Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2022/10/10 at 7:44 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 तपासात आले समोर : विजयकुमार देशमुखांना धमकी देणारा व्यक्तीच अस्तित्वात नाही□ लातूर । हासोरी परिसरात 24 तासांत भूकंपाचे दोन धक्के

● राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलांला अटक

 

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. Former Union Minister Sushilkumar Shinde’s attempt to steal mobile phone Solapur Dadar Siddheshwar Express

ही घटना गुरूवारी (ता.६ ) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दादर रेल्वे स्टेशन येण्याच्या पूर्वी घडली. मंदार प्रमोद गुरव (वय-२३, रा.मु.पो .घाटणे ,ता. माढा.जि. सोलापूर) असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना मुंबई येथे कामानिमित्त जायचे होते. त्यामुळे त्यांचे रिझर्वेशन हे गाडी नं १२११६ सिद्धेश्वर एक्सप्रेस बोगीच्या एचए-१ कंपार्टमेंटमधील कुपी नं ए मध्ये केले होते. त्यावेळी विलास कृष्णकांत गांवकर व संजय तुकाराम राजेशिर्के यांना पोलीस हवालदारांची या पीएसओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

 

दादर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी शिंदे हे बाथरूमला गेले होते. ते बाथरूममधून बाहेर आले असता, मंदार गुरव हा शिंदे यांचा सीटवर ठेवलेला मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी शिंदे यांनी त्याला रंगेहात पकडून ठेवले. त्यानंतर हवालदार गांवकर आणि राजेशिर्के यांना कुपीमध्ये बोलावून घेऊन मंदार गुरव याला त्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी हवालदार गांवकर यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

○ मोबाईल चोरणारा ‘सोलापूरचा’

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा मंदार गुरव हा सोलापुरातील माढा तालुक्यातील घाटणे गावचा असून, त्याचे वडील ग्रामपंचायत सदस्य आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा मुलगा आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 तपासात आले समोर : विजयकुमार देशमुखांना धमकी देणारा व्यक्तीच अस्तित्वात नाही

 

सोलापूर : पीएफआयवर बंदी घातल्याने चिडलेल्या कार्यकर्त्याने उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना धमकीपत्र पाठविल्याने खळबळ उडाली होती.

या प्रकारानंतर श्री. देशमुखांना सुरक्षेकरीता व्यक्तीगत सुरक्षा रक्षक देण्यात आला आहे. दरम्यान धमकी पत्र ज्या नावाने पाठविले त्या नावाचा व्यक्ती नसल्याचे तपासात समोर आले असल्याची अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली. महमद शफी बिराजदार (रा. सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) असे धमकीचे पत्र पाठविणाऱ्याचे नाव आहे.

 

महमद याने पत्रात पीएफआयवर बंदी घातल्याने नाराज असल्याचे नमूद केले आहे. सिमीवर बंदी घातल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला याची जाणीव आहे ना? असा प्रश्नही त्याने पत्रात आमदार देशमुख यांना विचारला आहे. प्रत्येक घरात कसाब, अफझल, युसूफ याकूब तयार होतील. कारण तुम्ही सापावर पाय ठेवला आहे असे महमदच्या पत्रात लिहलेले आढळून येते.

 

 

दरम्यान आ. देशमुख यांना व्यक्तीगत सुरक्षा जवान घेण्याची मुभा असतानाही ते घेत नव्हते. मात्र या धमकीपत्रानंतर शहर पोलिसांकडून त्यांना ही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. दरम्यान पत्राच्या अनुषंगाने पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या नावाचा व्यक्ती नसल्याचे आढळून आले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. शनिवारी धमकीपत्राचे पडसाद शहरात उमटले होते. भाजप कार्यकर्त्यांनी धमकीपत्र पाठविण्याचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

 

□ लातूर । हासोरी परिसरात 24 तासांत भूकंपाचे दोन धक्के

#surajyadigital #भूकंप #सुराज्यडिजिटल #लातूर #earthquake #Latur

लातूर जिल्ह्यातील हासोरी येथे 24 तासांत भूकंपाचे 2 धक्के जाणवले आहेत. पहिला भूकंप हा 2.1 रिश्टर स्केलचा होता. तसेच दुसऱ्या भूकंपाचे धक्के रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास जाणवले. हा भूकंप 1.9 रिश्टर स्केलचा होता. हासोरी, बडुर, पिरपटेलवाडी आणि अंबुलगा ह्या मुख्य गावासह या परिसरातील अनेक गावांना धक्का जाणवला असल्याचे सांगितले जात आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Former #UnionMinister #SushilkumarShinde's #attempt #steal #mobilephone #Solapur #Dadar #SiddheshwarExpress, #सोलापूर #दादर #माजीकेंद्रीयमंत्री #सुशीलकुमारशिंदे #मोबाईल #चोरण्याचा #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धनुष्यबाणावर प्रतिक्रिया न देण्याच्या राज ठाकरेंच्या सुचना, वेळ आल्यावर…
Next Article धरतीपुत्र, माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?