Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । रेल्वे अभियंत्याचे घर फोडून साडेबारा लाखाचा ऐवज लंपास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । रेल्वे अभियंत्याचे घर फोडून साडेबारा लाखाचा ऐवज लंपास

Surajya Digital
Last updated: 2022/10/11 at 10:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : दमाणी नगर परिसरातील सोनी सिटीमध्ये राहणार्‍या रेल्वे अभियंत्याचे घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असा एकूण 12 लाख 48 हजाराचा ऐवज चोरून नेला. ही चोरी दि. 1 ते 5 ऑक्टोंबर या दरम्यान घडली. Solapur. A railway engineer’s house was broken into and a compensation of twelve and a half lakhs was looted

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ घर फोडून ८७ हजारांचा एवेज चोरीला□ मोदी  चौकाजवळ  फायटर आणि दगडाने मारहाण; एक जण जखमी

 

सुरज सिताराम तिवारी (वय 33, रा. सोनी सिटी डी विंग, दुसरा मजला प्लॉट नं. 202/8, दमाणी नगर सोलापूर) यांनी फिर्यादी दिली. मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हे रेल्वे मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. 1 ऑक्टोंबर रोजी फिर्यादी त्यांच्या संपूर्ण परिवारासह तामिळनाडू राज्यातील रामेश्‍वर येथील भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेले असताना त्यांच्या सोलापूरमधील घराचे मुख्य दरवाजाला कडी कोयंडा लावून गेलेले होते.

 

दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोकड आणि घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तु असा एकूण 12 लाख 48 हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ घर फोडून ८७ हजारांचा एवेज चोरीला

सोलापूर : दशक्रिया विधीला गेलेल्या महिलेच्या घरातील 87 हजाराचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना रविवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी घडली.

किर्ती चंद्रशेखर कामत (वय- 37, रा. 23, सनमान नगर, मारूती मंगल कार्यालयाजवळ, जुळे सोलापूर) ही महिला तिच्या नंदेच्या पतीच्या दशक्रिया विधीसाठी घराला कुलूप लावून विजापूर रोड सैफूल येथे गेली असताना अज्ञात चोरट्याने तिचे बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

 

घरातील कपाटात ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे हार आणि 2 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट असा एकूण 87 हजाराचा ऐवज चोरट्याने चोरून नेला अशी फिर्याद किर्ती कामत यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरकुटे करीत आहेत.

 

□ मोदी  चौकाजवळ  फायटर आणि दगडाने मारहाण; एक जण जखमी

सोलापूर – राजकीय नेत्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यास सांगितल्याच्या कारणावरून फायटर, दगड आणि तलवारीने केलेल्या मारहाणीत अतुलकुमार राजेंद्र नागटिळक (वय ३५ रा. पापारामनगर) हे जखमी झाले.  ही घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास मोदी चौक परिसरात घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 नागटिळक हे मोदी चौकातून घराकडे जात असताना दीपक रतन गवळी यांना अक्षय पवार पोस्ट डिलीट करण्यास सांगितले. त्यावेळी मारुती गवळी, दिपक गवळी, राहुल सोनवणे, विशाल सोनवणे, आकाश सोनवणे, सुरज गवळी आदीने मारहाण केली अशी नोंद सदर बजार पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #railway #engineer's #house #broken #compensation #twelve #half #lakhs #looted, #सोलापूर #रेल्वे #अभियंता #घर #फोडून #साडेबारालाख #ऐवज #लंपास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह; पहिला हे चिन्ह कोणाचे होते वाचा
Next Article सोलापूर । सीसीएच ॲपच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?