सोलापूर : सीसीएच ॲपच्या माध्यमातून पैसे गुंतल्यावर दुप्पट पैसे आणि तेही अमेरिकन डॉलरच्या रूपात मिळतील या आमिषाला बळी पडलेल्या सोलापूरकरांची शान संख्या दिवसेंदिवस वाढत असून फसवणुकीचा आकडा जरी कागदावर ४५ लाख दिसत असला तरी तो कोटीच्या पुढे असण्याची शक्यता दाट आहे. CCH app fraud case will go to Financial Offenses Branch, Solapur
फसवणूक झालेल्या सर्वसामान्यांनी तक्रारी दाखल केलेले आहेत. परंतु लाखो रुपये गुंतवणूक केलेले प्रतिष्ठित मात्र पुढे येण्यास धजावत नसल्याचे दिसते. पोलिसांनी नागरिकांना अभय देऊन जास्तीत जास्त गुन्हे दाखल करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान फसवणुकीचा आकडा हा कोट्यावधीच्या पुढे असल्याने हा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्या दृष्टीने तपास चालू आहे. आरोपींनी हा ॲप कुठून मिळवला? त्यादृष्टीने तांत्रिक माहिती ही सायबर विभागाच्या माध्यमातून पुढे येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने ही अधिकारी वर्ग तपास करत आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी आरोपींचा कसून तपास करत असल्याचे सांगितले.
सोलापुरातील एका व्यक्तीने सीसीएच ॲप च्यामाध्यमातून तीन लाखाची गुंतवणूक केली. आणि त्याला महिनाभरात १३ लाख मिळाले. हाच मेसेज जवळपास सर्व दूर पोहोचल्याने अनेकांनी लाखो रुपयांच्या रकमा यात गुंतवल्याचे आता पुढे आले आहे.
सीसीएच ॲपच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यावर दुप्पट पैसे आणि तेही अमेरिकन डॉलरच्या रूपात मिळतील या आमिषाला बळी पडलेल्या तरुणांनी फौजदार चावडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
सोलापूर शहरातील चौपाड, दत्त चौक, मंगळवेढा तालीम, मुरारजी पेठ, भवानी पेठ आणि इतर ठिकाणच्या तरुणांनी मोबाईलवर ऑनलाईन आलेल्या सीसीएच अॅपवर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते. हे अमेरिकन अॅप असून त्या अॅपवर पैसे गुंतवणूक केल्यास अवघ्या काही दिवसात दुप्पट तिप्पट असा परतावा मिळणार आहे असे सांगण्यात आले. त्यानुसार सुरुवातीला काही लोकांनी कमी रक्कम गुंतवली होती त्यांना चांगल्या प्रकारे परतावा मिळाला आणि परतावा मिळालेल्यांनी त्या अॅपची चांगलीच प्रसिद्धी केली त्यावरून अनेकांनी या सीसीएच अॅपवर पैसे गुंतवले.
यामध्ये बेरोजगार तरुण, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, वकील, पत्रकार, छायाचित्रकार, डॉक्टर असे सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी आमिषाला बळी पडून पैशाची गुंतवणूक केली. परंतु गेल्या काही दिवसापासून हे अॅप बंद पडल्याने गुंतवणूक केलेल्यांना त्यांच्या पैशाचा परतावा मिळाला नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले असताना त्यांनी एकमेकांकडे विचारणा केली कोणाचे किती गेले ही विचारणा करून शेवटी काही तरुणांनी मंगळवारी सकाळी थेट फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर त्यांनी त्यांची व्यथा मांडली. अनेकांनी घरातील दागिने गहाण ठेवले, कोणी घरावर, वाहनांवर कर्ज काढले तर कोणी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे आणून त्या अॅप मध्ये गुंतवले आहे.
या प्रकरणी राम अनिल जाधव (रा. दक्षिण कसबा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आनंद येरमकोल्लू, जयंत येरमकोल्लू, स्मिता येरमकोल्लू (तिघे रा. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा आरोपींनी गुंतवणूकदारांना रक्कम दुप्पट व तिप्पट देण्याचे आमिष दाखवून रक्कम गुंतवणूक करण्यास लावली आणि सीसीएच या अॅपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली आहे. दक्षिण कसब्यातील चौपाड परिसरात येरमकोल्लू यांनी आपले कार्यालय थाटले होते. आता त्यांनी पलायन केले.
गुंतवणूक केल्यानंतर रक्कम दुप्पट व तिप्पट देण्याचे आमिष दाखवून सुमारे ३० तरुणांची ४५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेकडो नागरिकांनी या अॅपमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि अॅप बंद पडले आहे त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. ही फसवणूक चौपाड येथील चांदीचे दागिने आणि मूर्तिकार अनंत येरंकल आणि जयंत येरंकल्लू या दोघांनी हे अॅप सोलापूरमध्ये आणले आणि त्यांनी
सांगितले म्हणून अनेकांनी पैसे गुंतवले असा आरोप काही तरुणांनी पोलिसांकडे केला.
त्यानुसार त्यांनी तक्रारही दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच यामध्ये अधिकाऱ्यांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले असल्याची चर्चा सुरू होती. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.
ही फसवणूक चौपाड, शिंदे चौक, जुनी पोलिस लाइन, मुरारजीपेठ, पूर्वभाग व जिल्ह्यातील काही व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येत पैसे गुंतवल्याचे सांगत होते. त्यामुळे अनेकांनी हे अॅप डाऊनलोड करून पैसे गुंतवणूक केले. डॉलरच्या माध्यमातून हे पैसे गुंतत होते. कमिशन मात्र फक्त अकाउंटला दिसायचे. पण खात्यामध्ये काही पैसे आले नाहीत, अशी अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती एका तक्रारदाराने दिली.
या सीसीएच स्कॅममध्ये सुशिक्षित बेरोजगार, प्रतिष्ठित लोकांनी गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला छोट्या गुंतवणूकदारांना त्यांचा रकमा देण्यात आल्या..परंतु मोठ्या गुंतवणूकदारांना मात्र रकमा दिल्या नाहीत. चेन सिस्टिमने यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यात आले आहेत. अडीच लाखांची मशीन लाँच केली, त्यात अनेकांनी पैसे गुंतविले. लोकांनी जादा पैसे मिळतील म्हणून सावकारांकडून व्याजाने पैसे काढून भरले आहेत. परंतु आता हे अॅप बंद पडले आहे. हे अमेरिकेचे असल्याचे भासवले गेले, परंतु हे स्थानिक अॅप असल्याचे काहींने सांगितले.