Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : महापालिकेचे 131 रोजंदारी कामगार होणार कायम; मुख्यमंत्र्यांनी केली प्रस्तावावर स्वाक्षरी !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर : महापालिकेचे 131 रोजंदारी कामगार होणार कायम; मुख्यमंत्र्यांनी केली प्रस्तावावर स्वाक्षरी !

Surajya Digital
Last updated: 2022/10/14 at 10:20 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ महापालिका कामगार संघटना कृती समितीने केला पालिकेत जल्लोष साजरा !

सोलापूर : महापालिकेतील 131 रोजंदारी कामगारांना कायम करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्वाक्षरी केली आहे. यामुळे हे रोजंदारी कर्मचारी आता कायम होणार आहेत. दरम्यान, हे वृत्त समजताच महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका आवारात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. Solapur: 131 daily workers of Municipal Corporation will be permanent; The Chief Minister signed the proposal

Contents
□ महापालिका कामगार संघटना कृती समितीने केला पालिकेत जल्लोष साजरा !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● महापालिका आवारात कर्मचाऱ्यांचा जल्लोष !□ काळजे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

सोलापूर महापालिकेतील 131 रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित होता. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. अखेर या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी स्वाक्षरी केली आहे, याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी कामगार नेते अशोक जानराव यांना कळवली.

हे वृत्त समजतात कामगार नेते अशोक जानराव यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्याचबरोबर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने मुंबई येथे जाऊन रोजंदारी कामगारांना कायमच्या ऑर्डरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिका हिरवळीवर द्याव्यात, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे प्रत्यक्ष करणार असल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी सांगितले.

महापालिकेच्या 3100 पैकी 131 रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. दिनांक 26 ऑक्टोबर 1995 रोजी महापालिका सभागृहात महापालिका सभेत केलेल्या ठरावानुसार पालिकेतील रोजंदारी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम करण्यात येत होते. त्यापैकी 131 रोजंदारी कामगार सेवेत कायम करण्याचा प्रश्न प्रलंबित होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

अखेर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. कृती समितीच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केले आहे. तेव्हा या पुढील कार्यवाही महापालिका आयुक्तांनी करावी अशी विनंती ही करणार असल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी सांगितले.

 

यावेळी कामगार नेते चांगदेव सोनवणे , सरचिटणीस प्रदीप जोशी, अजय शिरसागर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

● महापालिका आवारात कर्मचाऱ्यांचा जल्लोष !

 

रोजंदारी कामगारांना कायम करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याबद्दल सोलापूर महापालिका आवारात महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली आनंदोस्तव साजरा करण्यात आला. गुलालाची मुक्त उधळण करीत हलगीच्या कडकडात घोषणा देण्यात आल्या.

 

□ काळजे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

 

सोलापूर महानगरपालिकामधील कामगारांना कायम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. हे सरकार गोरगरीब जनतेच आहे. हे पुन्हा एकदा सिध्द झालेल आहे. यासाठी कामगार नेत्यांसोबत आम्ही आग्रही होतो विनंतीकेली होती. झालेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री यांचे आभार. भविष्यातही हे सरकार सोलापूर महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या अनेक विषयांवरती नक्कीच कर्मचाऱ्यांच्या हिताचे चांगले निर्णय देईल, असे मनिष काळजे (बाळासाहेबांची शिवसेना, जिल्हाप्रमुख) यांनी म्हटले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #dailyworkers #MunicipalCorporation #permanent #ChiefMinister #signed #proposal, #सोलापूर #महापालिका #रोजंदारी #कामगार #कायम #मुख्यमंत्री #प्रस्ताव #स्वाक्षरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट । वीज पडून पाचजण जखमी; तीन गंभीर जखमी
Next Article सोलापूर । लम्पीसाठी साखर कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा : सीईओ स्वामी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?