Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना मिळणार उपस्थिती भत्ता !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना मिळणार उपस्थिती भत्ता !

Surajya Digital
Last updated: 2022/10/14 at 5:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ महापालिका महिला बालकल्याण विभागाची विशेष योजना !सोलापूर : महापालिका महिला बालकल्याण विभागाच्या वतीने विविध 17 योजनां राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यतच्या 1 हजार 758 विद्यार्थिनींना यावर्षीपासून दररोज 2 रुपये प्रमाणे शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार मिळणार आहे. यामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. Solapur. Attendance Allowance will be given to female and child welfare students in municipal schoolsस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ महापालिका महिला बालकल्याण विभागाची विशेष योजना !

सोलापूर : महापालिका महिला बालकल्याण विभागाच्या वतीने विविध 17 योजनां राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यतच्या 1 हजार 758 विद्यार्थिनींना यावर्षीपासून दररोज 2 रुपये प्रमाणे शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार मिळणार आहे. यामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. Solapur. Attendance Allowance will be given to female and child welfare students in municipal schools

सोलापूर महापालिका महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने या वर्षात विविध 17 नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांसाठी लाभार्थ्यांकरिता नियमावली निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक वर्षातील महापालिकेच्या प्रत्यक्षात उत्पन्नाच्या 5 टक्के खर्चाची तरतूद सोलापूर महापालिका महिला व बाल कल्याण विभागाच्या या विविध योजनांसाठी राहणार आहे.

पालिका प्रसूती गृहात जन्मलेल्या बालिकेस बेबी किट, पालिका शाळांमधील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता, विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास योजना, महापालिकेतील शाळेच्या इयत्ता पहिली ते दहावीतील मुला – मुलींना ऐतिहासिक स्थळ भेटी यासह आवश्यक अशा 17 विविध कल्याणकारी विविध योजनांचा समावेश आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

दरम्यान, महापालिका शाळांमधील मुलींना दररोज 2 रुपये उपस्थितीत भत्ता मिळणार आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थिनीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. एकूण 1 हजार 758 विद्यार्थिनींना यावर्षीपासून शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार मिळणार आहे. यासाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे.

या योजनेमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर आर्थिक मदत होणार आहे. सोलापूर महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता योजनेसाठी वार्षिक अंदाजे 20 लाख रुपये तरतूद आहे. असे महापालिका महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी सांगितले.

आकडेवारी प्राप्त झाल्याने आता महापालिका महिला व बालकल्याण विभागाकडून या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांच्यामार्फत महापालिका आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनींना हा उपस्थिती भत्ता मिळणार आहे असे कस्तुरे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शहरात मराठी,  इंग्रजी, कन्नड, उर्दू, तेलगू माध्यमांच्या एकूण 61 शाळा आहेत. या महापालिकांच्या विविध शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या एकूण 1 हजार 758 विद्यार्थिनी आहेत. त्यांना शाळा उपस्थिती भत्ता योजनेचा लाभ मिळणार आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Attendance #Allowance #femaleandchildwelfare #students #municipalschools, #सोलापूर #महापालिका #शाळा #विद्यार्थिनी #उपस्थिती #भत्ता #महिलावबालकल्याण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह सापडला
Next Article अक्कलकोट । अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतक-यांसाठी 42 कोटी मदत जाहीर

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?