सोलापूर : अल्पवयीन पीडितेवर लैंगिक छळ,अत्याचार व नैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपी राजू प्रकाश पिंकू राजपूत (वय -५०) यास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी वीस वर्षाची सक्त मंजुरीची शिक्षा ठोठावली. Solapur. Abuse of a minor victim; Twenty years of hard labor for the accused
या घटनेची हकीकत अशी की, पिडीता ही अल्पवयीन असून घटनेदिवशी आजी घरासमोर अंगण झाडत असताना त्यावेळेस आरोपी हा त्या ठिकाणी येवून पीडितेस दुकानात घेवून जातो असे सांगून स्वता:च्या घरी घेवून जावून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करुन लैंगिक छळ व अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाणे येथे रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास तत्कालीन स.पो.नि. शितलकुमार कोल्हाळ यांचेकडे देण्यात आला. त्यांनी गुन्ह्यांचा तपास करुन आरोपी राजू रजपूत यांचे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्रदाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता डी.शिरभाते यांचे समोर झाली.सरकार
पक्षातर्फे ॲड. प्रकाश एस.जन्नु यांनी पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने पीडितेवर लैंगिक छळ, अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याचे साक्षी पुराव्याद्वारे न्यायालयाच्या निर्दशनास आणले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपीतर्फे आरोपी स्वत: व त्याची आई असे दोन साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे पिडीता, पिडीतेची आई, पिडीतेची आजी, नेत्र साक्षीदार,पंच व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वपुर्ण होती. पिडीता ही अल्पवयीन असून ती न्यायालयात आरोपीने केलेल्या अनैसर्गिक क्रुत्य, लैंगिक अत्याचार बाबत दिलेला जबाब इतर साक्षीदार, पिडीतेची वैद्यकीय तपासणी झालेली नसताना सुध्दा याबाबत सरकारी वकील अॅड प्रकाश एस.जन्नु यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायाधीश कविता डी.शिरभाते यांनी आरोपी राजू रजपूत यास बाललैंगिक अत्याचार कायदान्वये दोषी धरण्यात आले. आरोपीस २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याप्रकरणात सरकारपक्षाच्या वतीने सहा.सरकारी वकील ॲड प्रकाश जन्नु व ॲड.दत्ता पवार यांनी काम पाहिले. आरोपीच्या वतीने ॲड.ए.डी.कुलकर्णी यांनी काम पाहिले.या प्रकरणाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉन्स्टेबल विक्रांत कोकणे, सुनिता घाडगे यांनी काम पाहिले आहे.
□ शहर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांची लूट
सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूरहुन तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहन धारकांची संख्या मोठी आहे. हे वाहनधारक सोलापूर शहरातील विविध मार्गावरून जात आहेत.
अशातच सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅफिक पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांची खुलेआम लूट सुरु आहे.नियमांचे दाखले देत हे ट्रॅफिक पोलीस भरचौकात भ्रष्टाचार करताना दिसून येत आहेत.काही सुजाण नागरिकांनी ट्राफिक पोलीस पैसे घेतानाचे चित्रीकरण करुन सोशल मीडियावर वायरल केले आहे. यामुळे सोलापूर वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे.
□ पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे यांनी दिले चौकशीचे आदेश
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे यांनी व्हाट्सएपद्वारे सोशल मीडिया ग्रुप तयार केला आहे. यामध्ये वाहतूक संबंधी विविध विषयांवर चर्चा होते. सोलापूर शहरात वाहतूक पोलीस वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडीओ डीसीपीच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये टाकण्यात आले.याबाबत अनेकांनी व्हिडीओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांनी ताबडतोब मी स्वतः वैयक्तिक चौकशी करून कारवाई करेन, असे आश्वासन व्हाट्सअपवर दिल्याची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता आनंद शिरसट यांची ड्युटी एसटी स्टॅण्ड समोर होती, तर राजेंद्र नागटिळक यांची ड्युटी पांजरापोळ चौक येथे वेगवेगळ्या ठिकाणी होती. पण यांनी एकत्र येत वसुली सुरु केल्याची माहिती आहे.