□ भंडारकवठे येथील अपघातात एक ठार; दोघे जखमी
सोलापूर : परीक्षा देऊन दुचाकीवरून भंडारकवठे येथे आपल्या घराकडे दुचाकीवरुन निघालेल्या युवकाच्या दुचाकीला अपघात होऊन एक युवक ठार झाला असून इतर दोन युवक जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता. 15) दुपारी तीनच्या दरम्यान मंद्रूप-निंबर्गी या मार्गावर घडली आहे. Solapur. While going home after the exam, the college boy put black on him
आदर्श सिद्धाराम बिराजदार (वय-१७.रा.भंडारकवठे, ता.द. सोलापूर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या अपघातात त्यांच्यासोबत असलेले कृषीराज महादेव धनुरे (वय-१७, भंडारकवठे) सचिन सोमनिंग चाबुकस्वार (वय-१७, रा. भंडारकवठे ) हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत वरील तिघे मित्र शिकत होते.
शनिवारी तिघेजण परिक्षा देऊन आपल्या दुचाकीवरून भंडारकवठे येथे आपल्या घरी निघाले. मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्तीजवळ ऊसाने भरुन भंडारकवठेकडे निघालेल्या ट्रँक्टरची ट्रॉली रस्त्यावरून धावताना इकडे-तिकडे गेली. यात पाठीमागून येणारी या युवकांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली आली.
यात आदर्श बिराजदार यांच्या मांडीवरून ट्रॅक्टरची चाक गेल्याने यात तो गंभीर जखमी झाला. तर दुचाकी चालविणारा कृषीराज धनुरे आणि सचिन चाबुकस्वार हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर तिघांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर । अल्पवयीन पीडितेवर अत्याचार; आरोपीस वीस वर्षांची सक्तमजुरी
सोलापूर : अल्पवयीन पीडितेवर लैंगिक छळ,अत्याचार व नैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपी राजू प्रकाश पिंकू राजपूत (वय-५०) यास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी वीस वर्षाची सक्त मंजुरीची शिक्षा ठोठावली.
या घटनेची हकीकत अशी की, पिडीता ही अल्पवयीन असून घटनेदिवशी आजी घरासमोर अंगण झाडत असताना त्यावेळेस आरोपी हा त्या ठिकाणी येवून पीडितेस दुकानात घेवून जातो असे सांगून स्वता:च्या घरी घेवून जावून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करुन लैंगिक छळ व अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाणे येथे रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास तत्कालीन स.पो.नि. शितलकुमार कोल्हाळ यांचेकडे देण्यात आला. त्यांनी गुन्ह्यांचा तपास करुन आरोपी राजू रजपूत यांचे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्रदाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता डी.शिरभाते यांचे समोर झाली.सरकार
पक्षातर्फे ॲड. प्रकाश एस.जन्नु यांनी पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने
पीडितेवर लैंगिक छळ, अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याचे साक्षी पुराव्याद्वारे न्यायालयाच्या निर्दशनास आणले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपीतर्फे आरोपी स्वत: व त्याची आई असे दोन साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे पिडीता, पिडीतेची आई, पिडीतेची आजी, नेत्र साक्षीदार,पंच व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वपुर्ण होती. पिडीता ही अल्पवयीन असून ती न्यायालयात आरोपीने केलेल्या अनैसर्गिक क्रुत्य, लैंगिक अत्याचार बाबत दिलेला जबाब इतर साक्षीदार, पिडीतेची वैद्यकीय तपासणी झालेली नसताना सुध्दा याबाबत सरकारी वकील अॅड प्रकाश एस.जन्नु यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायाधीश कविता डी.शिरभाते यांनी आरोपी राजू रजपूत यास बाललैंगिक अत्याचार कायदान्वये दोषी धरण्यात आले. आरोपीस २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
याप्रकरणात सरकारपक्षाच्या वतीने सहा.सरकारी वकील अॅड प्रकाश जन्नु व अॅड.दत्ता पवार यांनी काम पाहिले.तर आरोपीच्या वतीने अॅड.ए.डी.कुलकर्णी यांनी काम पाहिले.या प्रकरणाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉन्स्टेबल विक्रांत कोकणे,सुनिता घाडगे यांनी काम पाहिले आहे.