Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराज; शिंदे गटाचे आमदारास हृदयविकाराचा झटका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराज; शिंदे गटाचे आमदारास हृदयविकाराचा झटका

Surajya Digital
Last updated: 2022/10/18 at 4:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका बसला आहे. त्यांच्यावर रात्री औरंगाबादमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी मुंबईला एअर अँब्युलन्सने पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. 2 दिवसांपासून शिरसाट यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. Displeased at not getting ministerial opportunity; MLA of Shinde group Sanjay Shirasat has heart attack

 

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना काल हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना आज औरंगाबादहून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. काल दुपारी त्यांना त्रास जाणवू लागल्याने औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज तब्येत जास्त खालावल्याने सकाळीच त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

 

त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

संजय शिरसाठ यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. शिरसाट यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिरसाट यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातच त्यांनी सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम येथील आमदार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाटदेखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा 40 हजार 747 मतांनी पराभव केला होता.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात त्यांचा सहभाग होता. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर संजय शिरसाट यांनी शिवसेना नेतृत्वावर विशेषत: खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती.

संजय शिरसाट यांची 1985 मध्ये शिवसेनेचे शहर संघटक म्हणून नियुक्ती झाली होती. राज्यात 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. शिरसाट हे 2000 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर सलग तीन वेळेस शिरसाट यांनी विजय संपादन केला.

 

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

TAGGED: #Displeased #not #getting #ministerial #opportunity #MLA #Shindegroup #SanjayShirasat #heartattack, #मंत्रिपद #संधी #नाराज #शिंदेगट #आमदार #हृदयविकार #झटका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अजितदादांमागे पुन्हा ईडीची पीडा
Next Article उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?