बैठकीवर बहिष्कार : रेल्वे बाबू आणि लोकप्रतिनिधी यांच्यात घमासान
पुणे : सोलापूर आणि पुणे रेल्वे विभागीय समितीच्या बैठकीत प्रत्येक प्रश्नावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नकारात्मक उत्तरे देण्यात येत होती, त्यामुळे संतप्त झालेल्या तब्बल ९ खासदारांनी बैठकीतून बाहेर पडले. खासदाराने सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी आणि रेल्वे बाबू यांच्यात जोरदार घमासान पाहयला मिळाले. Ranjitsinh Naik Nimbalkar meeting scandal: MP resigns after being fed up with Railway Babu’s arbitrariness
अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने वैतागलेले माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तर थेट विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामाच दिला. पुणे आणि सोलापूर विभागीय समितीची बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या समितीत ३६ खासदार आहेत.
आयोजीत बैठकीत पूर्वी बंद केलेल्या रेल्वे सुरू करण्यात याव्यात. तसेच, जे थांबे बंद करण्यात आले आहेत, ते सुरू करण्यात यावेत अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांची भूमिका कायम निगेटिव्ह राहिली आहे, त्यामुळे मी रेल्वेच्या विभागीय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा खासदार नाईक निंबाळकर यांनी पुण्यात केली.
सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनानंतर रेल्वे थांबे पूर्ववत करावे आणि इतर मागण्या खासदार मंडळींनी केल्या असता रेल्वे अधिकारी यांचा मनमानीपणे कारभार सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या मनमानीला कंटाळून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या मंडळात ३६ खासदार सदस्य आहेत. रेल्वे समितीच्या बैठकीत आज प्रशासन आणि समितीची सदस्य असलेले खासदार यांच्यामध्ये मोठा वाद झाला. त्यामध्ये अध्यक्षांसह इतर खासदारांनीही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जेऊरसारख्या भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या प्रश्नावर हा वाद झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या वादाची रेल्वे मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, सोलापूर आणि पुणे विभागातील नऊ खासदार बैठकीला उपस्थित होतो. खासदारांच्या मागण्या आणि अडचणी सुचिवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून तीन आठवड्याभरापूर्वी सांगण्यात आले होते. त्या अडचणी या बैठकीत सोडविण्याचे आश्वासन दिले होते. रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रेझेंटशन झाल्यानंतर त्यांच्याकडून आमच्या बहुतांश प्रश्नाला निगेटिव्ह उत्तरे होती. आमच्या पातळीवरचे हे विषय नाहीत, असे सांगून ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी असमर्थतता दर्शवली. त्यामुळे बहुतांश खासदार संतप्त झाले. त्यामुळे खासदार निंबाळकर यांनी विभागीय समितीचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
□ खासदाराच्या या आहेत मागण्या
कोरोनापूर्वी ज्या स्थानकावर रेल्वे थांबा होता, असे सर्व थांबे पूर्ववत करावे. थांबा मिळावा, लोकांची गैरसोय थांबावी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांचे प्रश्न सुटावेत, भुयारी मार्ग, आणि दोन गावांना जोडणारे रस्ते जे रेल्वे अधिकार क्षेत्रात येतात ते दुरुस्त करावेत, कुर्डूवाडी रेल्वे डब्याचा कारखाना चालू रहावा, अशा मागण्या खासदारांनी केल्या होत्या. तसेच स्टेशन सुविधा आणि सुधारणा, किसान रेल यासाठी वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांना सांगूनही हे प्रश्न सुटत नसल्याने या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि रेल्वे बाबू यांच्यात जोरदार घमासान झाले.