Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई क्रिकेट असोसिएशन : सोन्याचे अंडी देणा-या कोंबडीसाठी राजकारणातील विरोधक येणार एकत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळराजकारण

मुंबई क्रिकेट असोसिएशन : सोन्याचे अंडी देणा-या कोंबडीसाठी राजकारणातील विरोधक येणार एकत्र

Surajya Digital
Last updated: 2022/10/19 at 10:21 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार येणार एकत्र एका मंचावरस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार येणार एकत्र एका मंचावर

 

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थातच एमसीए निवडणूक होणार आहे. एमसीएसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनेल उभं केले आहे. अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे रिंगणात आहेत. Fadnavis Pawar Shelar: Political opponents will come together for the chicken that lays the golden egg, Mumbai Cricket Association

 

राजकारणात कधी काय होईल, हे कोणालाच सांगता येणार नाही. राजकारणात विरोधक असणारे एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएन निवडणुकीनिमित्त ते एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल क्रिकेट सामने आणि देशातंर्गत क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून ‘एमसीए’ची आर्थिक भरभराट होते. त्यामुळेच सोन्याचं अंड देणाऱ्या या कोंबडीवर राज्य करण्यासाठी राजकारणी जिवाचं रान करत असल्याचे आता दिसत आहे.

बीसीसीआय आयपीएलमधून काही हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळविते. त्यातील निम्मा वाटा हा संघ मालकांना, तर काही वाटा हा सदस्य असलेल्या राज्य संघटनांना दिला जातो. संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत बीसीसीआयकडून मुंबई संघटनेला दरवर्षी पंचवीस ते तीस कोटी रुपये हे आयपीएलच्या नफ्यातून मिळाल्याची माहिती आहे.

शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार रोज क्लबच्या मेंबरसाठी स्नेहभोजन ठेवत आहेत. कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी कुणालाच आपल्या हातून गमावयची नाहीय. त्यामुळे ‘एमसीए’वर आपला ताबा राहावा यासाठी सर्व राजकारणी मंडळींनी आता चांगलीच कंबर कसली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शिवाय प्रत्येक मॅच संयोजनापोटी, मॅचच्या दरम्यान स्टेडियममध्ये लावल्या जाणाऱ्या जाहिरातींतून तसेच तिकिट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाचा वाटाही संबंधित संघटनांना दिला जातो. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत मुंबई क्रिकेट असोसिएशन संघटनेला शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी बीसीसीआयकडून मिळाला आहे. आणि आगामी वर्षात ही रक्कम ५०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

राजकारणात विरोधात पण क्रिकेटच्या मैदानात एकमेकांच्या हातात हात घातल्याचे चित्र दिसणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकत्र येणार आहेत. विविध राजकीय पक्षांचे पुढारी आज या निवडणुकीनिमित्त एकत्र येणार आहे. खासकरुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

 

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर हे तिघंही स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत. एमसीएसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनेल उभं केले आहे. अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे रिंगणात आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट ग्रुपकडून अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले माजी क्रिकेटर संदीप पाटलांसमोर पवार-शेलार महाआघाडीचे आव्हान असेल.

बक्कळ पैसा कमावण्यासाठीच निवडणुकांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणारे राजकारणी ‘एमसीए’च्या निवडणुकीत एकत्र आलेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांचं संयुक्त पँनेल झालं आहे. पवार-शेलार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांच्या नेत्यांचा समावेश दिसून येतो. यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे यांच्यासह शरद पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विहंग सरनाईक यांचा यात समावेश आहे.

 

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

TAGGED: #Fadnavis #Pawar #Shelar #Political #opponents #cometogether #chicken #lays #goldenegg #Mumbai #Cricket #Association, #मुंबई #क्रिकेट #असोसिएशन #मुंबईक्रिकेटअसोसिएशन, #सोन्याचे #अंडीदेणा-याकोंबडी #राजकारण #विरोधक #एकत्र #देवेंद्रफडणवीस #आशिषशेलार #शरदपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बैठकीत घमासान : रेल्वे बाबूंच्या मनमानीला कंटाळून खासदाराने दिला राजीनामा
Next Article Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?