मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची शिंदे-फडणवीस सरकारची बांधिलकी असून, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आलेल्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत आहे. Launch of fifty thousand incentive benefit scheme for farmers; Implementation from tomorrow
त्याचाच भाग म्हणून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात होणार असल्याची माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
राज्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-२०१८, २०१८ २०१९ आणि २०१९ २०२० – हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या प्रकियेला सुरुवात करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत सुमारे ७.१५ लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, २० रोजीच्या कार्यक्रमात निवडक पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे सावे म्हणाले.
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहित धरण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून ) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
२०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले
शेतकरीसुद्धा या योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या
वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारसांनाही प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.
योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. सदर प्राप्त याद्यांचे संगणकीकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.
□ पीएम किसान सम्मानचे 2,000 रु. आले नसेल तर हे करा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 17 ऑक्टोबरला पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ देण्यात येतो. हि रक्कम प्रत्येकी 2,000 रुपये वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. खात्यात रक्कम जमा झाली नसेल तर 011-24300606 किंवा 155261 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》वीज कोसळून तीन जण ठार
□ परतीच्या पावसाने धुमाकूळ
नांदेड : नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून तिघे ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. लोहा आणि हिमायतनगर तालुक्यात दोन ठिकाणी या घटना घडली. माधव पिराजी डुबुकवाड (वय 45, रा. पानभोशी, ता. कंधार), पोचिराम शामराव गायकवाड (45), रूपाली पोचिराम गायकवाड (16, दोघे पेठ पिंपळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धावरी येथे मंगळवारी (ता.18) दुपारी ४ वाजताच्या सुमारास ऊस तोडणीचे काम सुरू असताना ऊसतोड कामगारांच्या अंगावर वीज पडून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एक १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
गेल्या आठ दिवसापासून लोहा तालुक्यासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज दुपारी देखील विजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. यात धावरी येथील ऊसतोड कामगार काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
या घटनेत तीन जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे पोलीस कॉन्स्टेबल अशोक केंद्रे, सचिन गिरे यांनी शेतात जाऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी तहसीलदार, नायब तहसीलदारांनी भेट दिली. या पटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.