• सोलापूर : राष्ट्रवादीमधीलच काही लोकांना मी राष्ट्रवादी पक्षामध्ये रहावे, असे वाटत नाही. त्यांना माझी अडचण आहे. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि चुकीच्या बातम्या मॅनेज करून माझ्याविरोधात कटकारस्थान केले जात आहे, असा खुलासा माजी महापौर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्यांवर केला आहे. Conspiracy against me by spreading wrong news, Mahesh Kothe’s disclosure
महेश कोठे यांनी मुंबईत राष्ट्रवादी प्रवेश केल्याच्या बातम्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. याबाबत महेश कोठे यांना विचारला असता त्यांनी आपला प्रवेश झाला नाही, असे सांगितले. ज्या काही बातम्या आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तो जुना आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र देतानाचा जुना फोटो आहे. विनाकारण जुना फोटो प्रसार माध्यमात देऊन चुकीच्या बातम्या राष्ट्रवादीपक्षातील लोक देऊन बदनाम करत आहेत.
सोलापूर शहराची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यापासून राष्ट्रवादीमधील काही लोकांना माझी अडचण निर्माण झाली. त्यांना पक्षात मी नको आहे. त्यामुळे विनाकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण दिले गेले, असे त्यांनी सांगितले.
वास्तविक पाहता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय संपवला आहे. मी राष्ट्रवादीतच आहे असे जाहीरपणे पुण्यातील बैठकीत आणि सोलापुरात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याच्या प्रसंगी खुलास केला आहे. तरी देखील विनाकारण माझी बदनामी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींसमोर माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचे कोठे यांनी म्हटले आहे. पक्षाचे प्रदेशअध्यक्ष आणि नेत्यांनी या विषयावर पुन्हा चर्चा नको असे म्हटले असताना शहरातील काही मंडळी नेत्यांचे देखील ऐकत नाही या कृतीचा निषेध कोठे यांनी केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ धनत्रयोदशीला सोन्याच्या विक्रीत 25% पर्यंत वाढ होणार?
धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील सराफा बाजारात विक्री वाढण्याची शक्यता आहे. यंदा सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली राहण्याची अपेक्षा आहे. सणांवर खर्च करण्याबाबत लोकांचा धारणा वाढली आहे. याचा परिणाम सोने, दागिन्यांच्या खरेदीवरही होणार आहे. यंदा धनत्रयोदशीला सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी जास्त होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याचे भाव खाली आले आहेत.
■ फटाके फोडल्यास होणार सहा महिन्यांची जेल
दिवाळीनिमित्त आपण प्रत्येकजण फटाके फोडत असतो. पण जर तुम्ही फटाके फोडले तर तुम्हाला सहा महिन्यांची जेल होऊ शकते. ही बंदी दिल्लीत घालण्यात आली आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच दिल्ली सरकारने फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड लागेल आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल
□ फटाक्यांवर बंदी, मिठाईवर पैसे खर्च करा – सर्वोच्च न्यायालय
यंदा राजधानी दिल्लीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी आहे. याविरुद्ध भाजप नेते मनोज तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फटाके फोडण्यावरील बंदी मागे घ्यावी अशी याचिका त्यांनी केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दिल्लीत प्रदूषणाची समस्या आहे. लोकांना स्वच्छ हवा मिळू द्या, पैसे मिठाईवर खर्च करा, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.