Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दीपोत्सवाचे ‘राज’ कारण, ईडी सरकारने केले अनावरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

दीपोत्सवाचे ‘राज’ कारण, ईडी सरकारने केले अनावरण

Surajya Digital
Last updated: 2022/10/22 at 2:15 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ तीन पक्षाचा ‘संस्कृती’ संगम, राज्याने पाहिले दृश्य विहंगमस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)¤ पूर्वी एकत्र… सध्या तिघांची तोंडे तीन दिशेला¤ म्हणे राजकीय अर्थ काढण्याचा अनर्थ नको¤ विरोधकाचा विरोधक हा आपला समर्थक□ मुस्लीम सेवा संघाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

□ तीन पक्षाचा ‘संस्कृती’ संगम, राज्याने पाहिले दृश्य विहंगम

सोलापूर : राजकारणात कोण कोणाचा दीर्घकाळ मित्र किंवा शत्रू नसतो. कालचा विरोधक आज समर्थक होऊ शकतो. त्याला ‘राजकीय संस्कृती’ असे म्हणतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने पवार – शिंदे – फडणवीस यांच्या संगमाची संस्कृती पाहिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे-शिंदे-फडणवीस यांच्या मिलनाची दुसरी संस्कृती महाराष्ट्राला पहायला मिळाली. ‘Politics’ of Deepotsav, ED Govt unveils Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde Shivaji Park

 

संस्कृतीमध्ये ‘राज’कारण पाहू नका असे म्हणत ई-डी सरकारने ठाकरेंच्या दीपोत्सवाचे अनावरण केले. तीन पक्षांचा हा ‘संस्कृती’ संगम आणि त्याचे विहंगम दृश्य राज्याने पुन्हा एकदा पाहिले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीन दिग्गज नेते शुक्रवारी एकत्र आले. निमित्त होते दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेने आयोजीत
केलेल्या दीपोत्सवाचे.

 

मागील दहा वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर मनसेतर्फे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, यंदाचा दीपोत्सव विशेष ठरला तो एकनाथ शिंदे उपस्थितीमुळे. महाराष्ट्रात पुन्हा नव्या महायुतीची नांदी पहायला मिळेल अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

¤ पूर्वी एकत्र… सध्या तिघांची तोंडे तीन दिशेला

 

पूर्वी सेना-भाजपची युती होती. त्यावेळी ठाकरे कुटुंबीय आणि भाजपनेते एकत्र बसायचे. नंतर राज हे शिवसेनेतून बाहेर पडले. ठाकरे कुटुंबात फूट पडली. राज कधी भाजपवर तर कधी शिवसेनेवर टीका करत दोघांपासून समान अंतरावर राहिले. नंतर युती तुटली. आता शिवसेनाही फुटली. त्यामुळे पूर्वी एकत्र असलेले ठाकरे-फडणवीस दुरावले. सेना फुटल्यामुळे ठाकरे-शिंदे दूर गेले. उध्दव राज – यांच्यातून विस्तवसुध्दा जाईना. पण दीपोत्सवाच्या निमित्ताने उध्दव नसले तरी राज, शिंदे, फडणवीस एकत्र आले.

 

 

¤ म्हणे राजकीय अर्थ काढण्याचा अनर्थ नको

सेना फुटल्यापासून एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. दुसरीकडे फडणवीस – राज यांच्यातील दुरावासुध्दा संपला आहे. त्यातूनच फडणवीस, शिंदे आणि राज ठाकरे यांच्या एकमेकांच्या निवासस्थानी होणाऱ्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यातूनच काही राजकीय निर्णयसुध्दा झाले आहेत. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, या भेटीचा कोणी राजकीय अर्थ काढू नये. एकमेकांच्या विरोधातील राजकारण्यांच्या भेटीला राजकीय अर्थ असतोच, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले.

 

¤ विरोधकाचा विरोधक हा आपला समर्थक

 

सध्या उध्दव ठाकरे आणि फडणवीस हे एकमेकांचे विरोधक आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे हे एकमेकांचे विरोधक आहेत. तिसरीकडे राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हेसुध्दा एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. यात एका उध्दव ठाकरे यांचे अन्य तिघेही विरोधक आहेत. हे तिन्ही विरोधक एकत्र आले तरी त्यात उध्दव ठाकरेंच्या विरोधात खिचडी शिजणार नाही असे होणारच नाही. म्हणजेच विरोधकाचा विरोधक हा आपला समर्थक असतो; हाच विचार राज-शिंदे – फडणवीस यांनी केल्याचे राज्याने पाहिले.

 

□ मुस्लीम सेवा संघाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

 

 

उद्धव ठाकरेंना गेल्या काही काळापासून विविध संघटना आपला पाठिंबा दर्शवत आहे. नुकताच मुस्लीम सेवा संघाने त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, रायगडचे माजी खासदार अनंत गिते व स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित होते.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Politics #Deepotsav #EDGovt #unveils #RajThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #ShivajiPark, #दीपोत्सव #राजकारण #ईडीसरकार #अनावरण #राजठाकरे #देवेंद्रफडणवीस #एकनाथशिंदे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये तरुणीचा राडा
Next Article अनंत करमुसे प्रकरणात माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?