मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा सच्चा आणि कट्टर कार्यकर्ता असलेल्या सुनिल ईरावार याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. सुनिलच्या जाण्यामुळे मनसेवर शोककळा पसरली आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा सुनिलच्या कुटुंबीयांचा सांत्वन करण्यासाठी फोन केला तेव्हा आक्रोश ऐकून तेही स्तब्ध झाले.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.’ असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नांदेड जिल्ह्यातील किनवट इथं राहणाऱ्या सुनिल ईरावार याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुनिलने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. यात त्याने ‘राजसाहेब मला माफ करा’ असं म्हणत जीवन यात्रा संपवली.
राज ठाकरे यांनी ईरावार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी फोन केला होता. सुनिलच्या भावाने हा फोन उचलला होता. ‘जय महाराष्ट्र, मी, राज ठाकरे बोलतोय’ असं म्हणताच फोन पलिकडून बोलणाऱ्या भावाने ‘साहेब, तुमचा वाघ गेला हो, खूप प्रेम करायचा तुमच्यावर’ असं म्हणून एकच आक्रोश केला. हे ऐकून राज ठाकरेही काही काळ स्तब्ध झाले.
राज ठाकरे यांनी सुनिलच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त केले. सुनिलने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, निदान काही करण्याआधी माझ्याशी तरी बोलायचे, अशी विचापूस केली. तसंच लॉकडाउनचा काळ आहे, सध्या सर्वांनी काळजी घ्यावी, एकदा सर्वकाही सुरळीत झाले की, भेट द्यायला येईल, असं आश्वासनही राज यांनी दिले.
राज ठाकरे यांनी सुनिलच्या आत्महत्येनंतर सर्व मनसे कार्यकर्त्यांनी धीर देण्यासाठी एक पत्रकही प्रसिद्ध केले होते. पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, ‘पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले 14 वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील.
संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.
सुनील ईरावार आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की ‘साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा.’
अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच 9 मार्च 2006 ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नसल्याचे सांगितले.