Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । नंदेश्वर येथे सासूचा चाकूने खून; जावयाला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । नंदेश्वर येथे सासूचा चाकूने खून; जावयाला अटक

Surajya Digital
Last updated: 2022/10/24 at 12:50 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ सासूचा खून करून दरोडा पडल्याचा देखावा; जावयाला अटक; नंदेश्वर येथील घटनास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ तुंगत येथे मंदिरात पूजा करायची नाही म्हणून वृद्ध इसमास मारहाण□ चिकमहूद येथे चार चाकी वाहनाच्या धडकेने पादचारी ठार□ मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी

□ सासूचा खून करून दरोडा पडल्याचा देखावा; जावयाला अटक; नंदेश्वर येथील घटना

मंगळवेढा – जागेच्या वादातून सासूचा गळा कापून खून करून दरोडा पडल्याचा देखावा केल्याची घटना नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.या प्रकरणात मंगळवेढाच्या पोलिसांनी मयताच्या जावयास अटक केली. Solapur. Mother-in-law stabbed to death in Nandeshwar; Son-in-law arrested

शाकूबाई मारुती कोकरे (वय ४७ रा. नंदेश्वर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा खून केल्याप्रकरणी दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याला मंगळवेढ्याच्या पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास शाकुबाई कोकरे यांचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत घरात आढळला. याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवेढाच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा दरोडेखोर किंवा चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी मयताच्या जावई दादा उर्फ राजाराम शेजाळ आणि त्याची पत्नी यांना बोलावून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात तफावत आढळले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता दादा शेजाळ यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. मयत शाकुबाई कोकरे यांच्या वडीलांच्या (राजाराम शेजाळ) नावावरील ५ एकर शेतजमीन आपल्या नावावर करण्याकरिता शाकूबाई या सहकार्य करीत नसल्याच्या कारणावरून त्याने चिडून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

त्याप्रमाणे पोलिसांनी दादा शेजाळ याला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.

 

□ तुंगत येथे मंदिरात पूजा करायची नाही म्हणून वृद्ध इसमास मारहाण

सोलापूर – मंदिरात पूजा करायची नाही म्हणून ९० वर्षीय वृद्ध इसमास काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना तुंगत (ता.पंढरपूर) येथील बिरोबा मंदिरात शनिवारी (ता. 22) दुपारच्या सुमारास घडली.
सोमा कृष्णा कोळेकर (वय ९० रा. तुंगत) असे जखमी झालेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूर तालुक्याच्या पोलिसांनी अंकुश विठ्ठल काळे (रा.तुंगत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.  दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोमा कोळेकर हे मंदिरात बसले होते. त्यावेळी अंकुश काळे याने तु मंदिरात पूजा करायची नाही. येथे रहायचे नाही असे म्हणत त्यांना काठीने डोक्यात आणि छातीवर मारहाण केली. त्यानंतर मंदिरात ठेवलेले त्यांचे साहित्य बाहेर फेकून दिले. असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास फौजदार जाधव करीत आहेत.

□ चिकमहूद येथे चार चाकी वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

सोलापूर –  रस्त्यावरून पायी जाताना पाठीमागून मोटार धडकल्याने ३७ वर्षीय पादचारी युवक गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात शुक्रवारी (ता. 21) सायंकाळच्या सुमारास घडला.
 सागर रामलिंग ऐवळे (वय ३७ रा.चिकमहुद) असे मयताचे नाव आहे.  शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ते गावातून पायी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून एमएच०८-एजी-३२४५ या क्रमांकाची मोटार धडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते शनिवारी रात्री उपचारापूर्वी मयत झाले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

 

□ मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांत धुमाकूळ घातलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. मान्सून परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Mother-in-law #stabbed #death #Nandeshwar #Son-in-law #arrested, #सोलापूर #नंदेश्वर #सासू #चाकू #खून #जावई #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा उडाला फज्जा, मोजकेचे आले साहित्य
Next Article Rana & kadu राज्यातील दोन आमदारांमधील संघर्ष टोकाला, थेट पोलिस ठाण्यात तक्रार

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?