Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात व्यसनाधीनता आणि चारित्र्याच्या संशयावरून दोन खुनाच्या घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात व्यसनाधीनता आणि चारित्र्याच्या संशयावरून दोन खुनाच्या घटना

Surajya Digital
Last updated: 2022/10/24 at 10:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ वडिलांच्या डोक्यात मुलाने फरशी घालून केला खून□ रुद्धेवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने खूनस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 रुद्धेवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने खून; पतीविरुद्ध गुन्हा

□ वडिलांच्या डोक्यात मुलाने फरशी घालून केला खून

□ रुद्धेवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने खून

 

सोलापूर : सोलापूर शहर – जिल्ह्यात प्रत्येक घरात दिवाळी साजरा होत आहे. अशात सोलापुरात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. व्यसनाधिनतेतून आणि चारित्र्याच्या संशयावरून या दोन खुनाच्या घटना घडल्या. Two cases of murder in Solapur due to drug addiction and suspicion of character

 

दारू पिऊन आईसह कुटुंबातील सदस्यांना त्रास देणाऱ्या वडिलांच्या डोक्यात फरशी घालून मुलानेच खून केला. एमआयडीसी परिसरातील किर्ती नगरात काल रविवारी (ता. 23) मध्यरात्री घडली. आकाश बसवराज गवंडी (वय-२२, रा. सोलापूर) याला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले.

 

संशयित आरोपी आकाश व त्याचे वडिल बसवराज लक्ष्मण गवंडी (वय-५०,रा.सोलापूर) हे दोघेही ठेकेदाराकडे मिस्त्री म्हणून कामाला जात होते. मयत बसवराज यांना दारूचे व्यसन होते. आकाश हा देखील मद्यपान करायचा.

 

काल रविवारी घरी दोघेच होते. जेवण करून झोपल्यानंतर आकाशने मध्यरात्री फरशी स्वताच्या बापाच्या डोक्यात घातली. त्यात बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आकाश रात्रभर मयत बसवराज यांच्याजवळच झोपी गेला.

 

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास आकाश उठला आणि त्याने ठेकेदाराकडून ६०० रुपये घेतले. त्यानंतर त्याने थेट रेल्वे स्टेशन गाठले. हुबळी एक्स्प्रेसमधून विजयपूरला जाण्यासाठी त्याने तिकीट काढले आणि रेल्वेत जाऊन बसला.पण,एमआयडीसी पोलिसांना खूनाची वार्ता समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आकाशला रेल्वे सुटण्यापूर्वीच ताब्यात घेतले.

 

□ अन् पायाखालील जमीनच सरकली

आकाशचा लहान भाऊ हा बारावीमध्ये शिकतो. सतत होणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून तो बालपणापासून मामाकडे राहायला होता. दिवाळीनिमित्त आकाशची आई देखील माहेरी गेली होती. दिवाळीसाठी लागणारे पदार्थ घेऊन आकाशची आई व भाऊ आज सोमवारी सोलापुरात आले होते. पण त्या दिवशी हा प्रकार त्यांना दिसला आणि त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 रुद्धेवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने खून; पतीविरुद्ध गुन्हा

सोलापूर – चारित्र्याच्या संशयावरून २५ वर्षीय विवाहितेचा कोयत्याने खून केल्याची घटना रुद्देवाडी (ता.अक्कलकोट) येथे रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

 

शितल गणेश उपाडे (वय २५ रा.रेवली ता.परळी जि.बीड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात तिचा पती गणेश तुळशीराम उपाडे (वय २८) याच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिणच्या पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. काल रविवारी सकाळच्या सुमारास रुद्धेवाडी येथील मारुती पुजारी यांच्या शेताच्या बांधाजवळ शीतल उपाडे हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

 

चारित्राच्या संशयावरून तिचा पती गणेश उपाडे याने कोयत्याने खून केला. अशा आशयाची फिर्याद पोलीस नाईक नबीलाल मियावाले यांनी पोलिसात दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करीत आहेत .

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Two #cases #murder #Solapur #drug #addiction #suspicion #character, #सोलापूर #व्यसनाधीनता #चारित्र्य #संशय #दोन #खुन #घटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । आक्षेपार्ह व्हिडिओ व्हाट्सअपला ठेवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
Next Article सूर्यग्रहणाबरोबर व्हॉट्सअपला लागलेले ग्रहण अखेर सुटले, कोट्यावधी लोकांना दिलासा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?