सोलापूर : हिंगोली येथे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खोखो स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्याचा पुरुष व महिला खो खो संघ सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जाहीर केला. Solapur men’s and women’s team announced for state kho kho tournament
हे संघ निवड समिती सदस्य रामचंद्र दत्तू , प्रिया पवार, युसूफ शेख व नागेश माडीकर यांनी निवडले. संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
संघात निवड झालेल्या पुरुष खेळाडूंनी २८ ऑक्टोंबर राेजी स्वामी विवेकानंद प्रशाला जुळे साेलापुर येथे प्रशिक्षक माेहन रजपुत याचेशी तर महिला खेळाडूंनी वाडिकुराेली येथे प्रशिक्षक संताेष पाटील याचेशी सकाळी ९.०० वाजता संपर्क करावा. नंतर राखीव खेळाडूंना संधी दिली जाईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी, असे चव्हाण यांनी कळविले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
संघ : पुरुष : रामजी कश्यप, गणेश बोरकर, मुजफ्फर पठाण, समीर शेख (वेळापुर), कुणाल तुळसे, जुबेर शेख, विजय संकटे, विनीत दिनकर ( उत्कर्ष मंडळ), अक्षय इंगळे , राकेश राठोड, सौरभ चव्हाण ( किरण स्पोर्ट्स), हृतिक शिंदे (गोल्डन, मंद्रूप), राज दत्तू (मंगळवेढा ), योगेश सालीमठ ( न्यू सोलापूर क्लब), पृथ्वीराज तांगडे (लक्ष्मी टाकळी), राखीव : रोहित पाेतदार (मंगळवेढा), श्रीकांत खटके (दीनबंधू, मंद्रूप), निखिल कापुरे (उत्कर्ष).
महिला : प्रीती काळे, अमृता मला, संध्या सुरवसे, साक्षी काळे, शिवानी यड्रावकर, श्वेता भोसले, साक्षी देटे (केके स्पोर्ट्स वाडीकुरोली), ऋतुजा यलमार (वसंतराव काळे क्लब, वाडीकुरोली), सादिया मुल्ला, अर्चना व्हनमाने (किरण स्पोर्ट्स), श्रेया चव्हाण (उत्कर्ष), प्राजक्ता बनसोडे (वेळापूर), वसुंधरा फंड (नरखेड), सानिया पवार (लो. वि., वेळापुर), सानिका भोसले (मंगळवेढा) राखीव : प्रियांका वाघमोडे (सांगोला), स्नेहा निंबर्गी (किरण स्पोर्ट्स), सरिता कांबळे (मंगळवेढा).
□ देशात सूर्यग्रहणाला सुरुवात
पंजाबच्या अमृतसर येथे खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे.
#सुराज्यडिजिटल #solareclipse #SolarEclipse2022
#surajyadigital
* सूर्यग्रहणाच्या वेळा
– मुंबई- ग्रहणास सुरुवात 4.49 वाजता होईल.
– पुणे- ग्रहणास सुरूवात (4.51 वाजता) सूर्यास्त (6.31)
#सूर्यग्रहण
– नाशिक – ग्रहणास सुरूवात (4.47 वाजता) सूर्यास्त (6.31)
– नागपूर – ग्रहणास सुरूवात (4.49 वाजता) सूर्यास्त (6.29) –
#pune #nashikcity
– औरंगाबाद – ग्रहण सुरू (4.49 वाजता) सूर्यास्त (6.30)
#kholapur #kolhapurkar
– कोल्हापूर – ग्रहण सुरु (4.57 वाजता) सूर्यास्त (6.05)