□ दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडणी घेवू नका; हार घालून पायाही पडले
पंढरपूर : ऊस कारखानदारानी दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडणी घेवू नका, अशी विनंती करीत हार घालून पायाही पडले जात आहे. ऊसदर संघर्ष समितीने गांधीगिरी करत पंढरपुरात ऊसतोड रोखून गांधीगिरी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. Pandharpur Rokhli Ustod; Sangharsh Samitichi ‘Gandhigiri’ Usdar Movement Sugar Factory
यावर्षीच्या हंगामात ऊसाला एकरकमी पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करावी. या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘जो पर्यंत ऊस दर जाहीर केला जात नाही तो पर्यंत तोडणी थांबवा’ यासाठी ऊस मालक, तोडणी कामगार व वाहतुकदारांचा ऊसाच्या फडात जावून हार घालून अक्षरशः पाया पडून विनंती करीत गांधीगिरी करीत आंदोलनास सुरुवात केली. आज दुपारी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत परिसरात सुरु असलेल्या ऊसतोड रोखल्या आहेत. दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनाही सबुरीचा सल्ला देत ऊस वाहतूक करू नये; असे आवाहन केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे. परंतु जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाची पहिली उचल जाहीर केली नाही. यावर्षीच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये आणि अंतिम भाव 3 हजार 100 रुपये द्यावा; अशी प्रमुख मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ आंदोलन पेटण्याची चिन्ह
पंढरपूर येथे दोन दिवसांपूर्वी ऊस परिषदेत देखील हीच मागणी केली आहे. दोन दिवसात पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करा अन्यथा ऊस तोडी बंद पाडू असा इशारा परिषदेने दिला होता. त्यानुसार आज संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील ऊस तोड बंद पाडून ऊसदर आंदोलन सुरु केले आहे. ऊसदराच्या मागणीवरुन सोलापूर जिल्ह्यात आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
□ ऊस वाहतूक करू नका
उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना देखील आज सबुरीने सांगत उसाची वाहतूक करू नका असे आवाहन करण्यात आले आहे. ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर येथे उसाची पहिली उचल जाहीर झाली नसतानाही ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना हात जोडून, फुलाचा हार घालून, पाया पडून विनंती करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना ऊस शेती परवडत नाही, शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळवून देण्यासाठी ऊस दर संघर्ष समितीने आंदोलनाची हाक दिली आहे, अनेक वेळा विनंती करूनही ट्रॅक्टर मालक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे आज पंढरपूर येथे गांधीगिरीने या ऊस तोडणी कामगार, ऊस मालक व ट्रॅक्टर मालकांना हार घालून विनंती करण्यात येत आहे, असे ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.
□ विठ्ठल सहकारी साखर कारखाना दोन वर्षांनंतर सुरु
पंढरपूर तालुक्याचे अर्थकारणाचा कणा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा सुरू करण्यात चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह संचालक मंडळाला यश आले असून तालुक्यातील शेतकरी वर्गाला त्यामुळे आनंद झाला आहे. दिगवंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर बंद असलेला कारखाना सुरू करण्यात नविन संचालक मंडळाला यश आल्याने पंढरपूर तालुक्याचे अर्थकारण सुरळीत होणार आहे.
□ शेतकऱ्यांसाठी खूशखबर, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं
देशातील शेतकऱ्यांना विशेष ओळखपत्र (unique ID) देण्याच्या प्रक्रियेत मोदी सरकार सातत्याने काम करत आहे. आतापर्यंत 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी 5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. त्यांना 12 अंकी ओळखपत्र दिले जाणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकणार आहे. त्यांना कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नाही.