Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार, सोलापुरात मंत्रिपद कोणाला मिळणार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार, सोलापुरात मंत्रिपद कोणाला मिळणार ?

Surajya Digital
Last updated: 2022/10/26 at 6:00 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ अनेकांचे देव पाण्यात, इच्छुक गुंतले वशिला लावण्यातस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मंत्रिपदासाठी देव पाण्यात□ सोलापुरातून देशमुख की मोहिते-पाटील ?□ बच्चू कडूंची नाराजी दूर होणार का ?

□ अनेकांचे देव पाण्यात, इच्छुक गुंतले वशिला लावण्यात

 

• सोलापूर : एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातल्या त्यात सोलापुरातून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. Soon the second cabinet will be expanded, who will get the minister post in Solapur? Deshmukh Raut Mohite Patil

 

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मंत्रिपद नव्हते. शिंदे फडणवीस यांच्या पहिल्या विस्तारातही सोलापूरला मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती, त्यामुळे आता तरी जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

आत्तापर्यंत राज्यात फक्त कॅबिनेट मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्यमंत्री म्हणून कोणीही शपथ घेतली नव्हती, त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. पण हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ मंत्रिपदासाठी देव पाण्यात

 

मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे. तो कधी होईल हे सांगत येत नाही, त्यात भाजप व शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पण किती जणांना मंत्रिपद मिळणार? तसेच मंत्रिपदावरून दोन्ही गटात प्रचंड नाराजी आहे, अशातच फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 25) लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे येणारा काळच सांगेल.

□ सोलापुरातून देशमुख की मोहिते-पाटील ?

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजपचे ७ (अपक्ष मिळून) आमदार आहेत. त्यामुळे एक मंत्रिपद मिळावे, अशी सर्वांची इच्छा आहे. कॅबिनेट मंत्रिपद सोलापूरच्या वाट्याला आल्यास ज्येष्ठ आमदार म्हणून आ. सुभाष देशमुख यांची वर्णी लागेल, अशी शक्यता आहे. दुसरीकडे राज्यमंत्रिपद देण्याचे ठरल्यास आ. विजयकुमार देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील आणि राजेंद्र राऊत यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत ज्या-ज्यावेळी भाजपचे सरकार आले आहेत, त्यावेळी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली होती, आताही तसेच होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

□ बच्चू कडूंची नाराजी दूर होणार का ?

शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदेंचे सरकार स्थापन होताच यामध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा बच्चू कडू यांना होती. पण तसे घडले नाही, त्यामुळे त्यांनी अनेकदा जाहीररीत्या नाराजीही व्यक्त केली होती.

पण आपल्याला मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना संधी मिळतेय का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Soon #second #cabinet #expanded #get #minister #post #Solapur #Deshmukh #Raut #MohitePatil, #लवकरच #दुसरा #मंत्रिमंडळ #विस्तार #सोलापूर #मंत्रिपद #देशमुख #मोहितेपाटील #राऊत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दीपसुराज्य उजळत राहो; ‘३६०° सोलापूर’ आणि ‘दीपसुराज्य’ला सोलापूरची चांगलीच दाद
Next Article माझ्या संपर्कात 7 ते 8 आमदार; बच्चू कडूंचा इशारा; आम्ही वेगळा निर्णय घेवू

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?