Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजन मालकांनी अखेर ‘दांडपट्टा’ फिरवला, मनात दडलेला भाजपचा ‘हुंदका’ उफाळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

राजन मालकांनी अखेर ‘दांडपट्टा’ फिरवला, मनात दडलेला भाजपचा ‘हुंदका’ उफाळला

Surajya Digital
Last updated: 2022/10/31 at 1:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ अकलूजकरांच्या लाल दिव्यासाठी ‘विडा’ ही उचलला

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून मोहोळ माजी आमदार राजन (मालक) पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय तळ्यात मळ्यात आहे. प्रवेशाच्या वावड्या – इतक्या उठल्या की, मालकांनी त्याचा इन्कार केला नाही वा खुलासाही केला नाही. मात्र त्यांच्या मनात भाजपप्रेम दडलेले होते हेही लपून राहिलेले नव्हते. Rajan Malik finally turned the ‘penalty belt’, BJP’s ‘dowry’ hidden in his mind came out Rajan Patil Mohite Patil

Contents
□ अकलूजकरांच्या लाल दिव्यासाठी ‘विडा’ ही उचललास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ सोलापूर जिल्ह्यासाठी प्रेरणा□ स्वप्न सत्यात उतरवले…

 

अखेर अखेर राजन पाटील यांनी हृदयात साठलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यातून त्यांच्या मनात दडलेले भाजपप्रेम उफाळून आले. भाजप समर्थक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील संपर्क कमी झाला आहे, तो त्यांनी वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मालकांनी त्यांना लाल दिव्याची गाडी मिळावी म्हणून चक्क दंडही थोपटले. बीजेपीत माझे ऐकणारे आहेत, असा निर्वाळा दिल्यामुळे मालक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

मोहोळ तालुक्यातील पापरी येथे एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून मालक बोलत होते. सोलापूर जिल्हा अगोदर राष्ट्रवादीमय होता, तो आता कमी झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळावी, त्याच्यासाठी आम्ही वकिली करू; कारण भाजपमध्ये आमचेही ऐकणारे कोणीतरी आहेत, असे सांगून मालकांनी आपले भाजपमधील वजन प्रवेशाआधीच अधोरेखित केले.

 

वैमानिक झाल्याबद्दल ऋतुजा राजन पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल
डॉ. बाबासाहेब देशमुख, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अजिंक्यराणा पाटील या तिघांचा पापरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पापरी व भोसले कुटुंबीय यांच्या वतीने येथे नागरी सत्कार करण्यात आला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ सोलापूर जिल्ह्यासाठी प्रेरणा

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, आजच्या सत्कारमूर्ती या जिल्ह्याच्या प्रेरणा आहेत. ऋतुजा राजन पाटील या महिला वैमानिक झाल्याने महिलांचा स्वाभिमान वाढला आहे. जिल्ह्याच्या अडचणी सोडवण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासासाठी माहीर आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सहकार्य करू.

मालक म्हणाले, ‘जिल्ह्याच्या विकासात व जडणघडणीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, (स्व.) गणपतराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील संपर्क कमी झाला आहे, तो त्यांनी वाढवावा.

 

□ स्वप्न सत्यात उतरवले…

 

ऋतुजा पाटील म्हणाल्या, मी शाळेत असताना जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरविले. तुम्हीही तुमच्या मुलींना संधी द्या. या माझ्या स्वप्नाचे सर्व श्रेय आजी आजोबा, आई-वडील व भावांना जाते. या वेळी अजिंक्यराणा पाटील, नाना डोंगरे, प्रकाश चवरे, डॉ बाबासाहेब देशमुख, संगीता सावंत यांची भाषणे झाली. या वेळी प्रकाश कस्तुरे, पोपट देशमुख, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत चवरे, सरपंच जयश्री शंकर कोळी, उपसरपंच अमोल भोसले, रमेश कचरे, वैभव गुंड, रामदास चवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या वेळी आमदार यशवंत माने म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने मोहोळ तालुक्याचा १३० कोटींचा विकास निधी आडविला आहे, तो मिळण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी प्रयत्न करावा.

 

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

TAGGED: #RajanMalik #finally #turned #penaltybelt #BJP's #dowry #hidden #mind #RajanPatil #MohitePatil, #राजनमालक #राजनपाटील #दांडपट्टा #फिरवला #मनात #दडलेला #भाजप #हुंदका #उफाळला #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोरबी केबल पूल अपघात मृतांचा आकडा 141 वर; 140 वर्षे जुना पूल
Next Article दिल्लीचे ‘पाणी’ नाही चांगले, गड्या आपला महाराष्ट्रच परवडला

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?