सोलापूर – मुकादमच्या पत्नीला वाईट बोलण्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारून ट्रॅक्टर चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचजणांना आज कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. Solapur. Murder of sugarcane driver; Five people, including women, have been remanded in police custody
अभिमान बाजीराव साबळे (वय ४५) त्याची पत्नी मनीषा साबळे (वय ४०) अशोक भागिनाथ गिरी (वय ४३) त्याची पत्नी अंजना गिरी (वय ३९) आणि मल्लप्पा मलसिद्ध कांबळे (वय ५१ सर्व रा. मालकाची वाडी ता.शिरूर जि.बीड) अशी कोठडी सुनावलेल्याची नावे आहेत. त्यांना ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज बुधवारी दिला. या घटनेची फिर्याद बाळू भानुदास पवार यांनी पोलिसांत दिली.
सोमवारी (ता. 31 ऑक्टोबर) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मंद्रुप येथील सीतामाई तलावाजवळ रमेश केसव मिसाळ (वय ३४ रा.खोकरमोहा ता. शिरूर जि.बीड) या ट्रॅक्टर चालकाचा पाच जणांनी मिळून लाथाबुक्क्या आणि काठीने मारून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मिसाळ याचा मृतदेह पोत्यात भरून तो अभिमान साबळे याच्या खोलीत लपवून ठेवला होता.
या प्रकरणात मंद्रूपच्या पोलिसांनी मंगळवारी ५ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास फौजदार अमितकुमार करपे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोमवारी काय झाले
सोमवारी रात्री अकरा वाजता मुकादमच्या झोपडीजवळ रमेश मिसाळ यांच्यात वाद चालू होता. यावेळी अभिमान बाजीराव साबळे, अशोक बगीनाथ गिरी (दोघे रा.मलकाचीवाडी, ता. शिरूर , कासार) हे त्याला लाकडाने मारहाण करू लागले. पाठोपाठ मलप्पा मळसिद्ध कांबळे (रा. सादेपूर, ता.द.सोलापूर), मनीषा अभिमान साबळे, अंजना अशोक गिरी (दोघी रा. मलकाचीवाडी) हेसुद्धा भांडणादरम्यान मिसाळ यास मारहाण करु लागले. त्यावेळी साबळे याने काठीने रमेशच्या पाठीवर, दोन्ही पायांवर, दोन्ही हातांवर मारहाण केली. या जबर मारहाणीत मिसाळ याचा मृत्यू झाला.
रमेश मिसाळ ठार झाल्याची खात्री झाल्यावर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत पोत्यात भरून मुकादम साबळे याच्या झोपडीत ठेवले. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतल्यावर मृत मिसाळ याचा मृतदेह पोत्यात सापडला. पोलिसांनी या घटनेतील सर्व आरोपींना अटक केली असून आज पोलीस कोठडी सुनावली आहे.