Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे खासदार सुप्रिया सुळेंचे अभिवचन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे खासदार सुप्रिया सुळेंचे अभिवचन

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 4:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात महाराष्ट्र सरकारने अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना दिले आहे. या बाबत शासकीय पातळीवर लवकरच निर्णय होईल,’ अशी माहिती सक्षणा सलगर यांनी माध्यमांना दिली.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सक्षणा सलगर यांनी भेट घेतली. त्यांनी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शासकीय खर्चातून अहिल्यादेवींचे स्मारक उभा करण्याबाबत निवेदन दिले आहे. सुप्रिया सुळे यांना दिलेल्या निवेदनात सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे की,”पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण 118 महाविद्यालये आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्या महाविद्यालयातून 65000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठात एकूण 5 विभाग आहेत. विद्यापीठाकडे सुमारे 480 एकर जमीन आहे. विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक लोकवर्गणीतून करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने हे स्मारक उभा करावे,’ अशी अपेक्षा सलगर यांनी व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्रात सर्व विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे, स्मारके सरकारने उभा केले आहेत. मग, अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक लोकवर्गणीतून का करायचे? अहिल्यादेवी यांचे स्मारक सरकारने उभा करावे,’ अशी मागणी सक्षणा सलगर यांनी केली आहे.

या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात महाराष्ट्र सरकारने अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना दिले आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #सुप्रियासुळे #विद्यापीठ #अहिल्यादेवींचे #भव्यस्मारक #पाठपुरावा #अभिवचन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही”
Next Article पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाला विरोध करणा-या ‘या’ माजी मंत्र्यांचे नाव समितीतून वगळा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?