पंढरपूर : कार्तिकी शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल – रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक आले होते. या वारक-यांची आर्थिकहानी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने काळजी घेतली. विशेष पथकाने 58 संशियत चोरट्यांवर कारवाई केलीय. 58 suspected thieves arrested in Kartiki Yatra, police administration strives for smooth traffic
या यात्रा कालावधीत काही चोरट्यांचाही समावेश असतो. गर्दीचा फायदा घेवून चोरटे भाविकांच्या मौल्यवान वस्तू , पैसे लंपास करतात. या चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने 10 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने पंढरपूरामध्ये भाविकांच्या मौल्यवान वस्तूची चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तब्बल 58 संशयितांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरी होण्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपूर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व परिसरातील इतर स्थानिक गुन्हे शाखेचे वारकरी वेशभुषेतील एकूण 10 पथके तयार केली होती. सदर पथकाने गोपनीय माहिती काढून वारीमध्ये चोरी करण्यासाठी येणाऱ्या जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील सोनसाखळी चोर व इतर चोरांच्या टोळीवर बारकाईने लक्ष ठेवले.
शहरातील सर्व गर्दीचे ठिकाणे, चंद्रभागा वाळवंट येथून तब्बल 58 संशयित इसम हे विविध ठिकाणी चोरी करण्याच्या तयारीत असताना तसेच संशयास्पद फिरत असताना ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द सी.आर.पी.सी 109 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांच्या मौल्यवान वस्तुंच्या चोरी होण्यापासून प्रतिबंध करण्यास यश आले आहे. तसेच वारी कालावधीत कोणत्याही मोठया चोरीच्या गंभीर घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे वारकरी भाविकांची कार्तिकह वारी सुखकर होण्यास मदत झाल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कदम यांनी सांगितले.
ही कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरिक्षक अरुण फुगे, सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपूर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व परिसरातील इतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● वारी कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत
– वाहतूक व्यवस्थेसाठी 375 पोलीस अधिकारी, कर्मचारी: 13 ठिकाणी पार्किंग व्यवस्था
कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना पंढरपुरात येताना वाहतुकीबाबत कोणताही त्रास होऊ नये, शहरात तसेच शहराबाहेर वाहतुक कोंडी होऊ नये, वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी. यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने 15 पोलीस अधिकारी, 250 वाहतुक अंमलदार व 100 होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात होता. असे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
कार्तिकी यात्रा कालावधीत वाहतुक कोडीं होऊ नये यासाठी 11 ठिकाणी जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली होती. शहरात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांकरिता 13 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. मठात येणाऱ्या वाहनांकरीता वाहनपास देण्यात आले होते.
शहरात रस्त्यावंर कोठेही वाहन पार्क होणार नाही यासाठी 20 मोटार सायकल गामा पेट्रोलिंग नेमण्यात आले होते. त्यामुळे यात्रा कालावधीत कोठेही वाहतुक कोंडी झाली नाही. तसेच कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.