सोलापूर :- सीसीएच ॲपच्या माध्यमातून शहरातील लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनंत येरंकल्लू, जयंत येरंकल्लू, समिता येरंकल्लू या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. Solapur. Bail application of three rejected in CCH app fraud case
सीसीएच ॲपच्या माध्यमातून शहरातील लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनंत येरंकल्लू, जयंत येरंकल्लू, समिता येरंकल्लू या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात आरोपी सीसीएच ॲपचा प्रचार करत असल्याचा फोटो सादर केला. सीसीएच ॲपच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या तिघांनी मिळून फिर्यादी राम जाधव व इतर ३० जणांना सीसीएच क्लाऊड मायनर अॅपमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून ४५ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये भादंवि, माहिती तंत्रज्ञान कायदा व महाराष्ट्र ठेवी सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या घटनेला जवळपास वीसपेक्षा जास्त दिवस होत आले आहेत. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला, त्यानंतर एकही आरोपी पोलिसांना सापडला नाही. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला मदत करणाऱ्यांची नावे पोलिसांकडे आम्ही दिलेली आहेत, तरी पोलीस त्यांच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचू शकतात. पण तसे होत नाहीय. यामुळे आम्ही पुढील काही दिवसात पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन देणार असल्याचे फसवणूक झालेल्यांनी सांगितले.
या गुन्ह्याची तीव्रता पाहून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल होता. यामधील तिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केल होता, त्यावर आरोपींकडून ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी त सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, आरोपींनी ॲड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्या माध्यमातून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. युक्तिवादावेळी सीसीएच ॲप हे आरोपींनी तयार केले नाही. हे ॲप अमेरिकेतील कंपनीने तयार केले आहे. यामध्ये आरोपींचीही लाखोंची फसवणूक झाली आहे. त्यांनी फक्त या ॲपचे संदर्भ दिले आहे. या घटनेत खरे आरोपी पडद्याआड असल्याचा युक्तिवाद ॲड. कक्कळमेली यांनी केला. सरकारी वकील ॲड. रजपूत यांनी आरोपींचा या घटनेशी संबंध नसेल तर त्यांनी ऑफिस का उघडले, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अटकपूर्व जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश पाटवदकर यांनी तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. यावेळी न्यायालयात गुंतवणूकदार उपस्थित होते.