सोलापूर : जिल्हा व सत्र न्यायालयाने किरण लोहार यांना जामीन मंजूर केला; पण त्यांना शिक्षण सचिवांनी सेवेतून निलंबित केले आहे. ही कारवाई शिक्षण सचिवांनी केली असून खुल्या चौकशीला ‘लाचलुचपत’ अधीक्षकांची परवानगी दिलीय. Kiran Lohar gets bail; But Solapur was suspended from education service
लोहारांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आज जामीन मंजूर केला. तत्पूर्वी, जामीन अर्जावरील सुनावणीवेळी लोहारांचे वकीलानी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वास आला असून, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. संशयित आरोपी हा कोठेही पळून जाणार नाही, असा युक्तिवाद लोहाराच्या वकिलानी केला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी लोहारांना जामीन दिला. या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. शैलजा क्यातम यांनी तर संशयित आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
लाच प्रकरणात अडकलेल्या शिक्षणाधिकारी लोहारांचे निलंबन करताना शिक्षण सचिवांनी काही अटी घातल्या आहेत. निलंबन कालावधीत त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही; अन्यथा गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरवले जाईल. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांना निलंबन कालावधीत निर्वाह भत्ता, पूरकभत्ता मिळेल, असेही आदेशात नमूद आहे.
कोट्यवधींचा बंगला, प्लॅट, फ्लॉट व जमीन खरेदीची कागदपत्रे आणि कोट्यवधी रुपयांचे सोने खरेदीच्या पावत्या लाचलुचपत विभागाला सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागाने पुणे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षकांनी यांच्याकडे लोहारांची खुली चौकशी करायला परवानगी मागितली होती. त्याला अधीक्षकांनी मंजुरी दिली आहे.
यामुळे आता लोहारांनी गुंतवलेले पैसे, त्यांची मालमत्ता नेमकी किती हे समोर येण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, शिक्षण सचिवांच्या आदेशानुसार लोहारांना अटक झाल्यापासून ४८ तास होऊन गेले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियमांतर्गत आपल्या शक्तीचा वापर करून पुढील आदेश येईपर्यंत लोहारांना निलंबित केल्याचे आदेशात नमूद केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ लाचप्रकरणी कोषागार कार्यालयातील लेखा लिपिक यांनाही जामीन
सोलापूर : कोषागार कार्यालयातील लेखा लिपिक अश्विनी देविदास बडवणे यांनी तक्रारदार यांच्या वडिलांची पेन्शन रक्कम आईच्या नावे मिळण्यासाठी रक्कम रुपये ६ हजाराची मागणी करून पहिला हप्ता म्हणून रक्कम रुपये १५०० स्वीकारले.
पेन्शनच्या कागदपत्रावर सकारात्मक अहवाल देऊन पुढे पाठवण्यासाठी उर्वरित रक्कम रुपये ४५०० मागणी तक्रारदाराकडे केल्याने त्यांनी सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे अश्विनी बडवणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती.
तक्रारदाराकडून रक्कम ४ हजार ५०० रूपये स्वीकारताना लेखा लिपिक अश्विनी बडवणे यांना कोषागार कार्यालय,सोलापूर येथे रंगेहात पकडून अटक करण्यात आलेली होती. त्यानुसार आरोपीच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या प्रकरणात सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांनी अश्विनी बडवणे यांची रक्कम रुपये २० हजारच्या जामिनावर मुक्तता केली.
यात अश्विनी बडवणे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड.यशश्री जोशी, ॲड.मल्लिनाथ बिराजदार, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड.राणी गाजूल यांनी काम पाहिले.