Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिंदे गटातील आमदार वैतागले; पन्नास खोक्यांवरून टीका कराल तर मानहानीचा खटला होणार दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिंदे गटातील आमदार वैतागले; पन्नास खोक्यांवरून टीका कराल तर मानहानीचा खटला होणार दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/11/09 at 10:41 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ मविआ सरकारमधील तीन बडे नेते अडचणीत□ खोक्यांचे आरोप करणाऱ्यांना शिंदे गट मानहानीची नोटीस पाठवणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ मविआ सरकारमधील तीन बडे नेते अडचणीत

□ खोक्यांचे आरोप करणाऱ्यांना शिंदे गट मानहानीची नोटीस पाठवणार

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोक्यांवरून टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली. MLAs from the Shinde group were upset; If you criticize on fifty boxes, a defamation case will be filed Vijay Shivtare

विरोधक वारंवार शिंदे गटाच्या नेत्यांवर 50 खोके घेतल्याचा आरोप करत आहेत. आता यावरून शिंदे गट आक्रमक झाला आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मानहानीची नोटीस पाठवली जाणार असल्याचे शिंदे गटाचे नवनियुक्त प्रवक्ते विजय शिवतारेंनी सांगितले. 50 खोके घेऊन सरकार बनवले म्हणताय. तर मग अजित पवार सकाळी शपथविधीला गेले होते तर त्यांना किती खोके मिळाले. होते, असा शिवतारेंनी सवाल केला.

मात्र सत्तारांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे, दरम्यान शिंदे गटानेही त्यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना ५० खोक्यांवरील टीकेवरून इशारा दिला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर ५० खोके एकदम ओके म्हणत टीका करत असतात. मात्र या टीकेमुळे शिंदे गटातील आमदारही आता वैतागले आहेत.

दरम्यान ही टीका करण्यात अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार अशा एकूण ५० आमदारांच्यावतीने या तीनही आमदारांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती शिंदे गटातील प्रवक्ते शिवतारे यांनी दिली आहे.

अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे या तीन नेत्यांनी शिंदे गटातील नेत्यांची बदनामी केली म्हणून जाहीरपणे माफी मागावी अन्यथा बदनामीच्या खटल्याला कायदेशीर मार्गाने सामोरे जा, असा इशारा शिंदे गटाने दिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. अब्दुल सतार यांनी केलेल्या विधानाचे कोणीही समर्थन करणार नाही, त्यांचे विधान चुकीचेच आहे.

 

मात्र हे विधान त्यांच्या तोंडून का बाहेर आलं याचाही विचार व्हायला हवा. वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप करत बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच संयम सुटल्यानेच अब्दुल सत्तार यांचे स्लिप ऑफ टंग झाले, असं विजय शिवतारे म्हणाले. तसेच अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी अशी बदनामी केल्याने त्यांनी कोर्टात ५० खोके घेतल्याचे पुरावे सादर करावेत. अन्यथा २५०० कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याच्या नोटिसा दिल्या जातील, असंही शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #MLAs #Shindegroup #upset #criticize #fifty #boxes #defamation #case #filed #VijayShivtare, #शिंदगट #आमदार #वैतागले #पन्नासखोक्यांवरून #टीका #मानहानी #खटला #दाखल #नोटिसा #विजयशिवतारे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रम बंद केल्याने सोलापूरचा ‘टेक्स्टाईल हब’ येणार अडचणीत
Next Article Blog उपेक्षेचे धनी ठरलेले लालकृष्ण अडवाणी; वृध्दापकाळात उपेक्षा वाट्याला आलेला राजकीय प्रवास

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?