मुंबई : संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राऊत आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ‘संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही, असे ठाकरे यावेळी म्हणाले. संजय राऊतांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अडकवले जाऊ शकते, असेही ते म्हणाले. Sanjay Raut my best friend – Uddhav Thackeray, Raut’s first attack on Raj Thackeray press conference
संजय राऊत यांनी 103 दिवसांनी जेलबाहेर आल्यानंतर आज पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊतांनी पहिला हल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चढवला. “आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे, मला ईडीने जी अटक केली ती बेकायदेशीर होती असं कोर्टाचं म्हणणं आहे.
राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला” असं संजय राऊत म्हणाले. जेलमध्ये राहणं आनंदाची बाब नाही. मोठमोठ्या भिंती असतात, त्या भिंतींशी बोलावं लागतं. वीर सावरकर दोन वर्षापेक्षा जास्त जेलमध्ये राहिले, लोकमान्य टिळक, अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये कसे राहिले असतील? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलं आहे. लोक मला विसरले असतील असं वाटलं, पण तसं झालं नाही. लोकांना माझी काळजी आहे, प्रेम आहे. अनेकांचे फोन आले. आज सकाळीच शरद पवारांचा फोन आला. त्यांचीही प्रकृती ठिक नाही. कोठडीतले दिवस खडतर होते. मी कायदेशीर बाबींवर जास्त भाष्य करणार नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कोर्टाने मला जामीन दिला आहे. पूर्ण देशात जल्लोषाचा माहोल झाला. मी टिपणी करणार नाही, ना ईडी ना ज्यांनी कट रचला त्यांच्यावर. त्यांना आनंद मिळाला असेल तर ठिक. माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं, कुटुंबाने, माझ्या पक्षाने भोगलं, खूप गमावलं. राजकारणात हे होत राहतं.
मात्र अशाप्रकारचं राजकारण देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हाही असं घडलं नव्हतं. शत्रूबाबतही घडलं नसेल. मी याबाबत कोणाला दोष देणार नाही, सिस्टिमला दोष देणार नाही. चांगलं काम करण्याची संधी सर्वांना मिळते, त्यांनी करावं, असं संजय राऊत म्हणाले.
□ संजय राऊत यांनी घेतली पवारांची भेट
खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती आहे. याआधी राऊत यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली. दरम्यान, राऊत यांना बुधवारी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामीन मिळाला. त्यानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली.
मी सर्वांची भेट घेणार आहे. दोन तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत, त्यामुळे त्यांना भेटणार, असं राऊत म्हणाले.