□ ‘सदगुरू’चा पहिला हप्ता २५०० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : कर्णवर पाटील
सोलापूर : सोलापूर – सांगली जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या व सद्गुरू श्री श्री रविशंकर यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी या कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताचा उद्देश समोर ठेवून सन २०२२/२३ हंगामासाठी गळीतास आलेल्या ऊसाला पहिला हप्ता २५०० रूपया प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. Sadguru Sri Sri Sugar Factory Limited Rajewadi Solapur sugarcane price puzzle broke out; Success to the Sangharsh Committee
गेली महिनाभर चाललेल्या ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनाला अखेर यश आले असून चेअरमन एन शेषागिरीराव, व्हाईस चेअरमन बाळासो कर्णवर पाटील व संचालक मंडळाचे आणि कारखान्याचे सी.एफ. ओ रोहित नारा यांना शेतकरी वर्गातून धन्यवाद देऊन आनंद व्यक्त केला जात आहे.
● इतर कारखान्यांनी सदगुरूचा आदर्श घ्यावा
सोलापूर जिल्ह्यात पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करावी यासाठी मागील महिन्याभरापासून ऊसदर संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे एक महिन्यापासून ऊसदरासाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. आमची मागणी तीन हजार शंभर रुपयांची आहे. त्यातील पहिला हप्ता हा अडीच हजार रुपये मिळावा अशी मागणी आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप अडीच हजार रुपये पहिली उचल जाहीर केलेली नाही. मात्र सद्गुरू साखर कारखान्याने आज ऊसदराची कोंडी फोडली असून पहिली उचल अडीच हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● २५०० रुपयांचा पहिला हप्ता
ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून राजेवाडी चा सदगुरु कारखाना काम करीत आहे. लागवडीखालील क्षेत्र वाढवून उपयोग नसून प्रतिएकरी ऊस उत्पादन वाढवून किफायतशीर परतावा मिळण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे. यंदा गळितास येणाऱ्या उसास २५०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.
□ शेतक-यांचे हित पाहणा-या कारखान्याविषयी गैरसमज नको
आमच्या कारखान्यांचा हा अकरावा गळीत हंगाम असून मागील दहा हंगामात आम्ही एफआरपी पेक्षा १७७ रु जादा दर दिले आहेत. तरीही काही समाजकंटक आमच्या कारखान्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असतात. यावर्षी गळीतास येणाऱ्या ऊसाचा पहिला हप्ता २५०० रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरू केले आहे.
वजन काटा कुठेही उभा करा त्यासाठी लागणारा निम्मा पैसा सदगुरु कारखाना देईल व निम्मा पैसा तुम्ही उभा करा. म्हणजे दुध का दूध और पाणी का पाणी होईल. परंतु आता तरी शेतकऱ्यांनी तुमचे हित बघणाऱ्या कारखान्यांबाबतीत गैरसमज करून घेवू नये. आणि ज्या सभासदांना खाजगी वजन काट्यावर ऊस वजन करून आणायचा असेल त्यांनी बिनधास्त करून यावे.
– बाळासाहेब कर्णवर-पाटील, व्हा. चेअरमन, सदगुरु कारखाना
“आमच्या आंदोलनाला यश आले आहे. अन्य साखर कारखाने जोपर्यंत आमची मागणी पुर्ण करत नाहीत तो पर्यंत त्या – त्या साखर कारखान्याच्या विरोधात ऊसदराचे आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देत त्यांनी या कारखान्यांचा आदर्श घ्यावा, अन्यथा आंदोलन तिव्र करू”
दिपक भोसले, ऊसदर संघर्ष समिती समन्वयक
सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीने सन २०२२ – २३ या गाळप हंगामातील ऊसाला पहिली उचल २५००/- रुपये व अंतिम दर ३१००/- रुपये मिळावा असे आवाहन केल्यानंतर राजेवाडी येथील कारखान्याने पहिली उचल २५००/- रुपये जाहीर केली हे अभिनंदनिय आहे. परंतु जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही ऊस परिषदेमध्ये जाहीर केलेल्या दराप्रमाणे अंतिम दर ३१००/ रुपये मिळावा यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करू व घामाचा दाम मिळवू.
– माऊली हळणवर, समन्वयक ऊसदर समिती