सोलापूर : सोलापूर शहरात आज मंगळवारच्या कोरोना अहवालानुसार कोरोनाचे तब्बल 113 रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रूग्णांचा बळी गेला आहे. आज 113 ची भर पढल्याने आता एकूण 6 हजार 64 कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत 393 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 64 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 525 तर महिला 2 हजार 539 रुग्णांचा समावेश आहे. आज शास्त्री नगर परिसरातील 75 वर्षाच्या पुरूषाचा अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत शहरांमध्ये 393 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 263 तर महिला 130 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 2 हजार 99 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 986 अहवाल निगेटिव्ह तर 113 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 50 हजार 429 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 44 हजार 365 अहवाल आले आहे. पॉझिटीव्ह 6 हजार 64 आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1102 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून एकूण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 569 झाली आहे.