Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास पंतप्रधान मोदींसह उपमुख्यमंत्री फडणवीस येणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास पंतप्रधान मोदींसह उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

Surajya Digital
Last updated: 2022/11/12 at 9:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) ● न्यायालयीन कोठडी : अखेर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

सोलापूर : सुक्षेत्र श्रीशैल येथे श्रीशैल पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे द्वादश पीठारोहण व जन्म सुवर्ण महोत्सवनिमित्त आयोजित राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती महाराष्ट्र विभागाचे स्वागत अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. Prime Minister Narendra Modi along with Deputy Chief Minister Devendra Fadnavis will attend the Shrishail Peetha program

 

शनिवारी मुंबई येथे नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी, मैंदर्गीचे निलकंठ शिवाचार्य महास्वामी व समाजसेवक कांतप्पा धनशेट्टी आदी शिष्टमंडळातील सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दि. १० ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलनच्या कार्यक्रमास येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सध्या श्रीशैल पिठाचे जगद्गुरूंचे येडूर ते श्रीशैल असे ५६० किलोमीटरचे पदयात्रा चालू असून ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रा श्रीशैल येथे पोहचणार आहे. दरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. श्रीशैल येथे दि.१ डिसेंबर ते १० जानेवारी पर्यंत जगद्गुरुंचे ४१ दिवसांची धार्मिक अनुष्ठान, रुद्रहोम,इष्टलिंग महापूजा, जगद्गुरुंच्या लिंगोद्भव मूर्तीचे बिल्वार्चन, धर्म प्रबोधन, तुलाभार कार्यक्रम व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

१० ते १५ जानेवारी या पाच दिवशी राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन, राष्ट्रीय वीरशैवागम समावेश, तेलगू, मराठी, कन्नड भाषा बंधुत्व कार्यक्रम, भक्तनिवास ,हॉस्पिटल महासभामंडप, वसती शाळा, संस्कृत गुरुकुल यांचे पायाभरणी कार्यक्रम, हिंदी, इंग्रजी, तेलुगु भाषेत अनुवादित केलेले सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचे लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध मान्यवर येणार असल्याची माहिती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

 

● न्यायालयीन कोठडी : अखेर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

 

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणात आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडला होता. प्रेक्षकांना व चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. असल्याच्या आरोप त्यांच्यावर होता.

 

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांनी तत्काळ जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर दुपारी सुनावणी होणार आहे. त्यांच्यावर ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. आव्हाडांनी या चित्रपटात विद्रुपीकरण झाल्याचा आरोप केलेला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #PrimeMinister #NarendraModi #along #DeputyChiefMinister #DevendraFadnavis #attend #Shrishail #Peetha #program, #श्रीशैल #पीठ #कार्यक्रम #पंतप्रधान #मोदी #उपमुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर । कार्तिकी यात्रेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे 3 कोटी रुपयांचे उत्पन्न
Next Article भीमा साखर कारखाना : निवडणुकीचा प्रचार पोहचला नको त्या पातळीवर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?