नवी दिल्ली : भारताचा उपकर्णधार आणि सलामी फलंदाज फलंदाज रोहित शर्मा याची 4 खेळाडूंसह भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान – राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. हे वृत्त वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे.
रोहित बरोबर आशियाई खेळातील सुवर्णपदकविजेती विनेश फोगाट, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्राआणि पॅरालंपिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थांगावेलू यांचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि अन्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निर्णयासाठी निवड समितीने मंगळवारी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2016 नंतर प्रथमच या पुरस्कारासाठी 4 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर रोहित हा पुरस्कार मिळवणारा फक्त चौथा क्रिकेटपटू बनू शकतो. 1998 मध्ये खेल रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या सचिन हा पहिला क्रिकेटपटू होता.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा रोहित हा भारताचा चौथा क्रिकेटर ठरणार आहे. सचिन तेंडुलकर 1997-98 , एमएस धोनी 2007 आणि विराट कोहली 2018 यांना याआधी हा सन्मान देण्यात आला आहे.