ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.. तसेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यानंतर ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यात काही ठिकाणी आव्हाड यांच्या समर्थकांनी जाळपोळ केली आहे. रिक्षा बंद पाडल्या आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. Jitendra Awhad accused of molestation, arson in Mumbra, will resign from MLA
भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. महिलेने दावा केला की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीलाला स्पर्ष करत बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधत तक्रार दाखल केली, याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता आव्हाडांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे. विविध कारणाने वादात सापडणारे आव्हाड यांच्यावरील गुन्ह्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. ‘पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 354. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं त्यांनी म्हटलंय.
लैंगिक शोषण, मारहण किंवा महिलांच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं कृत्य करणाऱ्यांविरोधात या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. दरम्यान आव्हाड यांनीही आक्रामक भूमिका घेत थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.आज सकाळपासूनच ठाण्यात तणाव निर्माण झाला असून आव्हाड यांच्या विवियाना मॉलजवळच्या घरासमोर काही ठिकाणी रस्त्यावर जळलेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.
Jitendra Awhad accused of molestation, arson in Mumbra, will resign from MLA
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाडांवर दाखल होणारा हा दुसरा गुन्हा आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी-जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आव्हाड यांच्या या ट्विटचे पडसाद त्यांचा मतदार संघ असलेल्या मुंब्र्यात लगेच उमटले. संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपासवर सकाळीच जाळपोळ सुरू केली आहे. सकाळीच हा प्रकार झाल्याने बायपासवर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोरच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेंच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली. ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा आज लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडला. त्यावेळी पुलाच्या श्रेय वादावरून आव्हाड आणि श्रीकांत शिंदेंच्यात वाद झाला.
शिंदे आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती. त्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले श्रेय घ्यायचे नाही मात्र लोकांना माहीत आहे काम कुणी केलंय अस म्हणत बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आव्हाड यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, कौन किसके शादी मे जा रहा है, हे लोकांना माहिती आहे. कोणी वेगळं नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री पुलाचं उद्धाटन करणार आहे असे स्पष्ट केलं.