सोलापूर : पाच महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका २० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील दक्षिण सदर बाजार परिसरात शनिवारी (ता. 12) सायंकाळच्या सुमारास घडली. मयताच्या सासरकडील मंडळींनी मृतदेह रुग्णालयात सोडून गायब झाले होते. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याची तक्रार मयताच्या माहेरकडील लोकांनी पोलिसासमोर केली आहे. Solapur. A young woman who got married five months ago committed suicide by hanging, suspicion of accidental death
मिस्बा शाहिद कुरेशी (वय २० रा. उ. सदर बजार, लष्कर) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेतली होती. तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मयत झाली. अशी नोंद सदर बजार पोलिसात आहे.
विजयपूर (कर्नाटक) येथील बेपारी यांची मुलगी मिस्बा हिचा विवाह सोलापुरातील शाहीद कुरेशी याच्या सोबत गेल्या २२ मे रोजी विजापूर येथे झाला होता. विवाह नंतर तिचा पती शाहिद कुरेशी, सासू रजिया, दीर निजाम कुरेशी याच्यासह ७ जण तिला पैशाच्या कारणावरून शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते.
शनिवारी रात्री मयताचे चुलते इस्माईल बेपारी यांना मुलगी रुग्णालयात दाखल असल्याचे समजले. तेव्हा सर्वजण सोलापुरात येऊन रुग्णालयात गेले होते. त्यावेळी मयत मिस्बा हिच्या माहेरकडील त्या ठिकाणी हजर नव्हते. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. असा अर्ज मताचे चुलते इस्माईल बेपारी (रा. विजयपूर) यांनी सदर बाजार पोलिसांकडे दिला.
शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मिस्बाचा मृतदेह माहेरकडील लोकांनी विजयपूर येथे अंत्यसंस्कारासाठी नेला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि मयताच्या नातेवाईकांची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्राथमिक तपास महिला हेडकॉन्स्टेबल मंजुळा वाघमोडे या करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या
सोलापूर – दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका ३८ वर्षीय विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना हंजगी (ता.अक्कलकोट) येथे घडली.
वैशाली सिद्धाराम कोळी (वय ३८ रा. हंजगी) आणि असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे त्याचे नाव आहे. तिचा पती सिद्धाराम हा रोज दारू पिऊन घरात येत होता. त्यास कंटाळून तिने शुक्रवारी पहाटेच्या समारस कीटकनाशक प्राशन केली होती. तिला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारारादरम्यान ती शनिवारी पहाटे मरण पावली. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
● ट्रॅक्टरच्या अपघातामधील जखमीचा मृत्यू
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेने जखमी झालेले प्रकाश चंद्रकांत तरटे वय (३८ रा.वाळूज देगाव ता.मोहोळ) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शनिवारी सकाळी मरण पावले. ते ८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नरखेड येथून घराकडे निघाले होते.त्यावेळी पाठीमागून ट्रॅक्टर धडकल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना पांडुरंग (भाऊ) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या अपघाताचे प्राथमिक नोंद तालुका पोलीसात झाली आहे.
● एसटी अडवून ड्रायव्हरला मारहाण तोळणुर येथील घटना
अक्कलकोट – तोळणुर (ता.अक्कलकोट) येथे एसटी अडवून मारहाण केल्याने वीरभद्रप्पा सिद्रामप्पा माने (वय ५४ रा. दुधनी ता.अक्कलकोट) हे ड्रायव्हर जखमी झाले. ही घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. ते एसटी घेऊन निघाले होते. तोळणूर येथे गडयाप्पा लच्याण याने बस अडवून त्यांना हाताने मारहाण केली. आणि त्यांना स्टेरिंग वरून खाली ओढून ड्रेस फाडला. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
● मोबाईल हिसकावून घेतल्याने तरुणीने केले विष प्राशन
सोलापूर – दिवाळीच्या सुट्टीत बहिणीच्या घरी राहण्यात गेलेल्या एका अल्पवयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केली. ही घटना शेटफळ (ता. मोहोळ) येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
पोखरापूर येथे राहणारी ती अल्पवयीन तरुणी दिवाळीच्या सुट्टीत शेटफळ येथे मोठ्या बहिणीच्या घरी आली होती. काल सायंकाळच्या सुमारास ती मोबईल बघत असताना मोठ्या बहिणीने मोबाईल हिसकावून घेऊन तिला रागावले होते. त्यामुळे तिने पिकावर फवारणीचे द्रव प्राशन केली. तिला वडिलांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.