नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडाने दिल्ली हादरली आहे. मुंबईतल्या श्रद्धा वालकरची प्रियकर आफताबने दिल्लीत हत्या केली आहे. आफताब व श्रद्धाची मालाडमधील कॉल सेंटरमध्ये मैत्री झाली होती. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण घरच्यांच्या विरोधामुळे ते दिल्लीत लिव्ह-इनमध्ये राहत होते. श्रद्धाला लवकर लग्न करायचे होते. त्यामुळे आफताबने 18 मे रोजी तिची हत्या केली. मृतदेहाचे 35 तुकडे केले व वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. Shraddha’s murder in Mumbai shook everyone, the lover committed the ambush, the National Commission for Women took notice
राष्ट्रीय महिला आयोगाने श्रद्धा वालकर हत्याकांडाची दखल घेतली आहे. ‘ही एक भयानक घटना आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना सविस्तर अहवाल मागितला आहे. प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपीला कठोर शिक्षा केलीच पाहिजे, ज्यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील’, असे आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. दिल्लीत आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाची तुकडे करून विल्हेवाट लावली.
वसईतील माणिकपूर मधील 27 वर्षीय तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रद्धा असे मृत तरुणीचे नाव असून आफताब अमीन पूनावाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
श्रद्धा वालकर ही तरुणी वसईतील संस्कृती अपार्टमेंट या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होती. श्रद्धाचे कुटुंबीय हे वसईतील मूळ रहिवाशी आहे. श्रद्धाचे बालपण याच संस्कृती अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील घरात गेले आहे. तिच्या घरात वडील आणि भाऊ राहतात.
वसई गावातील जिजी कॉलेजच्या बाजूला संस्कृती अपॉईंटमेंट आहे. या अपॉईंटमेंटमध्ये श्रद्धा वालकर आपल्या कुटुंबासोबत राहत असताना 2019 मध्ये मालाड येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती.
They came to Mehrauli PS & we immediately initiated legal action. They had pvt jobs in Mumbai & the man had started working here. He has been identified as Aftab Poonawalla. They got together via dating app, were in a live-in relationship in Mumbai & continued here: Ankit Chauhan pic.twitter.com/gdjA4XOSMp
— ANI (@ANI) November 14, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब हे दोघे मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होते. येथे दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी आपल्या प्रेमाची माहिती घरच्यांना दिली. मात्र घरच्यांनी विरोध केल्याने दोघेही दिल्लीला पळून गेले आणि लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दिल्लीमध्ये छतरपूर भागात दोघे एकत्र रहात होते. श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते. मात्र श्रद्धा लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत असल्याने आफताबने तिचा खून केला.
अनेक दिवस झाले तरी मुलीशी संपर्क न झाल्याने आणि सोशल मीडियावर तिने एकही पोस्ट न टाकल्याने श्रद्धाच्या आई – वडिलांना संशय आला. श्रद्धाचे वडील विकास मदन वॉकर यांनी थेट दिल्ली गाठली. आफताब आणि श्रद्धा रहात असलेल्या फ्लॅटवरही ते गेले. मात्र तिथे कुलूप असल्याचे पाहून त्यांनी मेहरौली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा समजून तपास सुरू केला. मात्र आफताबला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले.
लिव्ह-इनमध्ये असताना श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत असे. यावरून आमच्यात भांडणे होत होती. 18 मे रोजीही लग्नावरून आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. सततच्या कटकटीने कंटाळल्याने आपण श्रद्धाचा गळा आवळून खून केला आणि तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. यानंतर हे तुकटे फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर दिल्लीतील अनेक भागात हे तुकडे फेकले, अशी माहिती आफताबने पोलीस चौकशीत दिली.
श्रद्धाच्या खुनाचा पत्ता लागू नये म्हणून आफताबने अत्यंत थंड डोक्याने विचार करत तिच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. यासाठी त्याने 300 लीटरचा नवीन फ्रिजही खरेदी केला. यानंतर रोज दुपारी दोन वाजता फ्लॅटमधून बाहेर निघायचा आणि मृतदेहाचा एक-एक तुकडा फेकून येत होता. 16 दिवस त्याचा हा सिलसिला सुरूच होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे तुकडे तो रोज रात्री 2 वाजता घरातून बाहेर पडायचा आणि एक-एक करून ते मेहरूली जंगलात टाकत होता. तो सलग 18 दिवस हे तुकडे जंगलात टाकत होता. जंगलात हे तुकडे टाकत असताना त्याला वाटत होत की, आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांना कळणार नाही. मात्र 6 महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, डेक्सटर वेब सिरीज पाहिल्यानंतर आफताबने ही हत्या केली. त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना या वेबसीरिजमधून आली, असं सांगितलं जात आहे.