□ दोनच महिन्यापूर्वी आईचे निधन
बंगळुरू : साऊथचे सुपरस्टार महेश बाबू यांचे वडील व अभिनेता कृष्णा (79) यांचे हैदराबादेत निधन झाले. कृष्णा हे अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांचे सासरे होते. रविवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे 4 वाजता मंगळवारी (ता. 15) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता कृष्णा यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये भूमिका केली. South superstar Mahesh Babu’s father actor Krishna passed away
अभिनेता कृष्णांनी केले 350 चित्रपटात काम अभिनेता महेश बाबुचे वडील कृष्णा हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 350 चित्रपटात भूमिका साकारल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. कृष्णा यांचा जन्म 31 मे 1943 रोजी आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
कृष्णा घट्टामनेनी यांना काल सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही कृष्णा घट्टमनेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची त्यांनी आठवण करून दिली. तसंच, कृष्णा यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
This is Heart Breaking. Our SUPERSTAR KRISHNA Garu is no more.
Legend 🙏🏽 Icon and Inspiration for Generations …. We will all Miss You sir .
Praying for strength to the family @ManjulaOfficial , @urstrulyMahesh sir. May god be with you in this Testing time. pic.twitter.com/gm9OlQQYsL— Nikhil Siddhartha (@actor_Nikhil) November 15, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दोनच महिन्यांपूर्वी महेश बाबू यांच्या आईचं निधन झालं होतं. आता त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने महेश बाबू यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या जाण्याच्या दुःखातून सावरत नसतानाच वडिलांचीही माया हरपल्याने महेश बाबू सध्या इमोशनल ट्रॅजिडीतून जात आहेत. महेश बाबू यांच्या पालकांशी फार कनेक्टेड होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच आपल्या आई-वडिलांचे फोटो शेअर केले आहेत.
सिनेविश्वाला एका नव्या उंचीवर नेण्यात कृष्णा घट्टमनेंनी खूप मदत केली. पाच दशकांच्या कारकिर्दीत ते 350 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले आणि 1961 मध्ये पदार्पण करणाऱ्या कृष्णाला पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. कृष्णा एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी देखील होता. कृष्णाचे पहिले लग्न इंदिरा आणि दुसरे विजय निर्मला यांच्याशी झाले होते. त्यांना एकूण 5 मुले असून त्यापैकी 2 मुले आणि 3 मुली आहेत.
कृष्णा घट्टामनेनी यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांचा 2008 साली एका प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले होते. अशातच आता वडिलांच्या निधनाने महेश बाबू पोरके झाले आहेत. जवळच्या तीन व्यक्तींच्या मृत्यूनंतर ते कोलमडले आहेत. कृष्णा घट्टामनेनी यांचे दोन लग्न झाले आहेत. 28 सप्टेंबर 2022 रोजी महेश बाबूची आई आणि कृष्णा यांची दुसरी पत्नी इंदिरा देवी यांचं निधन झालं. तर 2019 मध्ये कृष्णा यांच्या पहिल्या पत्नीचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत काम करणं बंद केलं.