Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठरवलं तर पंढरपूर व मोहोळ तालुक्यात परिवर्तन करू शकतो : खा. धनंजय महाडीक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

ठरवलं तर पंढरपूर व मोहोळ तालुक्यात परिवर्तन करू शकतो : खा. धनंजय महाडीक

Surajya Digital
Last updated: 2022/11/15 at 9:26 PM
Surajya Digital
Share
9 Min Read
SHARE

मोहोळ : आपण सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहोत हा १२ बैलाचा औत तयार झालेला आहे पंढरपूर आणि मोहोळ या दोन तालुक्यांमध्ये आपण जे ठरवेल ते होऊ शकत, या दोन तालुक्यात परिवर्तन करू शकतो, असा ठाम विश्वास भीमा सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी व्यक्त केला. If decided, Pandharpur and Mohol talukas can be transformed: mp Dhananjaya Mahadeek Bhima Sugar Factory

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 पाटील – परिचारकाच्या गटाचा सुपडा साफ; महाडीकांची विजयाची हॅट्ट्रिक

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकल्यानंतर कारखान्यासमोर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक, जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी उपसभापती मानाजी माने, राष्ट्रवादीचे राज्य सचिव रमेश बारसकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, सोलापूर शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे, पंढरपूरचे कल्याणराव काळे, भगीरथ भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रेे, दिनकर पाटील, प्रभाकरभैया देशमुख, सुरेश शिवपूजे, शिवानंद पाटील, रामराव पाटील, दत्ता सावंत, सर्जेराव चवरे, छगन पवार, शिवाजी पाटील, चरणराज चवरे, संजीव खिलारे, सुधीर भोसले, भीमराव वसेकर , दिगंबर माळी, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण आदी उपस्थित होते.

 

 

मुन्ना महाडीक म्हणाले, विश्वराज हा माझा मुलगा अमेरिकेमध्ये बोस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याला नोकरीत १ कोटीचे पॅकेज मिळालं होतं. परंतु त्याने ते सर्व नाकारून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आला आहे. त्यांनी संपूर्ण परिसराची माहिती घेतली आणि कारखान्यांमध्ये लक्ष घातलं आहे. दररोज दीड लाख लीटर इथेनॉल तयार करण्याचा इथेनॉल प्रकल्पासाठी त्याला सर्वांनी सहकार्य करा, असे त्यांनी आवाहन केले.

सुधाकरपंत परिचारक हे लुनावर फिरत होते, परंतु प्रशांत परिचारक हे तोंडात सोन्याचा चमचा घेवूनच जन्माला आले आहेत. एवढी मोठी संपत्ती कशी जमवली माहीत नाही. राजन पाटील हे यामाहावर फिरत होते. त्यांची ही संपत्ती भरपूर आहे. पुण्यात, मुंबईतही प्रॉपर्टी आहे. सोलापुरात त्रिपुरसुंदरी हे ५० कोटीचे हॉटेल घेतले आहे. दोघेही खरबोपती झालेले आहेत. यांना भीमा कारखान्यात लक्ष घालायची गरज नव्हती. दोन जागेसाठी परिचारक तयार झाले होते. परंतु राजन पाटील यांनी दहा जागाची मागणी केली अन निवडणूक आपल्यावर लादली. सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवली असल्याचा टोमणा मारला. तसेच यापुढे प्रत्येक दोघाच्याही प्रत्येक वेळी आडवे जाणार असल्याचे आवर्जून सांगितले.

 

पापरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य डिगंबर माळी यांनी या निवडणुकीदरम्यान महाडिक पॅनेलचा विजय होत नाही, तोपर्यंत मी डोक्यावर टोपी घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. पॅनल विजयी झाले, त्यामुळे खासदार महाडिक यांनी त्यांना स्वहस्ते टोपी घालून त्यांचा सन्मान केला. यावेळेस उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 पाटील – परिचारकाच्या गटाचा सुपडा साफ; महाडीकांची विजयाची हॅट्ट्रिक

सोलापूर/ मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आज झाली. यात पाटील – परिचारक गटाचा सुपडा साफ झाला असून खासदार धनंजय महाडीक यांच्या विजयाची हॅट्ट्रिक झालीय.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मोहोळ मंगळवेढा आणि पंढरपूर या तीन तालुक्याची आर्थिक नाडी असणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व म्हणजे १५ जागावर मतदारांनी विद्यमान चेअरमन आणि भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत प्रचंड मतांनी सलग तिसऱ्यांदा कारखान्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिले आहे.

 

 

दरम्यान या निकालामुळे मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा यातील तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे सभासदाबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या आणि त्या संबंधित छोटे – मोठे उद्योगाच्या अर्थकारणाची निगडित असते. कारखान्यात येणारा ऊस आणि त्याचं योग्य वजन आणि मिळणारा समाधानकारक दर याची खात्री देणारा आणि आगामी पाच वर्ष कारखाना नीट चालू शकेल अशा व्यक्तीच्या हातात सत्ता देणे आवश्यक असते, असा विचार मतदाराच्या मनात असतो आणि गेल्या वर्षभरात खासदार मुन्ना महाडिक यांनी या दृष्टीने टाकलेली पावले ही त्यांना विजयाकडे घेऊन गेल्याचे दिसून येत आहे.

राज्यात शेतकरी संघटना दरासाठी आक्रमक आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी उसाचा दर निवडणुकीपूर्वीच २६०० रुपये जाहीर करून टाकला आणि उचल देण्याची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांची चांगलीच कोंडी झाली.

धनंजय महाडीक यांच्यासोबत प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, विश्वराज महाडीक, मानाजी माने, रमेश बारसकर, भाजपाचे नेते माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, भैया देशमुख, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, विद्यमान उपाध्यक्ष सतीश जगताप, तालुका प्रमुख प्रशांत भोसले, सरचिटणीस महेश सोवनी आणि रमेश माने, भाजपचे प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा संयोजक अविनाश पांढरे, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, काँग्रेसचे शाहीर हावळे, भिमराव वसेकर, सुरेश शिवपुजे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

● राजन पाटील का हरले ?

राजन पाटील यांनी स्वतःचा साखर कारखाना निवडणुका टाळण्यासाठी मल्टीस्टेट केला, भीमावर लोकनेतेची निर्मितीची उभारणी केली, हा विरोधकांनी केलेला प्रचार कारणीभूत ठरला. प्रशांत परिचारक यांचा एक खाजगी व एक सहकारी साखर कारखाना आहे, असे असताना राजन पाटील, प्रशांत परिचारक यांनी एकत्र येवून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णयच सभासदांना रुचला नाही.
राजन पाटील व त्याची दोन मुले असा एकांगी प्रचार होता. इतर दिग्गज नेते नव्हते. कामगारामधील असंतोष व कर्ज याशिवाय मुद्दाच नव्हता. महाडीक यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे देवू शकले नाहीत. दर आणि वजनकाटा याबाबत मौन पाळले. त्यामुळे माजी आमदार पाटील व परिचारक यांच्या भीमा बचाव पॅनलला सभासदांनी अक्षरश: झिडकारले आहे.

 

□ महाडीक का विजयी झाले ?

भिमा सहकारी कारखान्याच्या निवडणूकी पूर्वी महाडीक यांनी २६०० रु दर जाहीर केला आणि २२०० रुपये उचल देण्याची घोषणा, इथेनॉल प्रकल्प वर्षभरातच सुरु करण्याच दिलेले आश्वासन , विश्वराज महाडीक यांनी वाढवलेला जनसंपर्क व शेतकरी सभासदाना दाखलेली आपुलकी, विरोधक भाव जाहीर करण्यात असमर्थ ठरले. विरोधकांच्या प्रचारात ठोस मुद्दे नव्हते. राजन पाटील यांनी टाकळी येथील सभेत केलेले वक्तव्य याचाही सभासद मतदारावर परिणाम झाला. त्यामुळे त्याही गोष्टीचा महाडिक यांना विजयासाठी चांगलाच फायदा झाला.

□ पहिल्या दोन फेरीतच विजयाची खात्री

 

भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकांची मतमोजणी आज सकाळी सोलापूरात श्री सिध्देश्वर मंगल कार्यालयात सुरु झाली आहे. आज दुपारी १ वाजता मिळालेल्या प्राथमिक कलानुसार महाडीक यांच्या भिमा शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार काही मतदारसंघात ३५०० मतांनी आघाडीवर आहेत.

खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, प्रशांत परिचारक,अभिजित पाटील हे निवडणूक मैदानात आहेत. या निवडणूकसाठी 15 संचालकांसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. भीमा सहकारी कारखान्यातील 78.86 टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

पहिल्या फेरीत मतदान बूथ क्रमांक १ ते २८ वरील मतांचे गठ्ठे एकत्र करुन मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीमध्ये सभासदांचा कल पुन्हा एकदा विद्यमान चेअरमन तथा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भीमा शेतकरी विकास आघाडीच्या बाजूने साधारण कल असल्याची माहिती आहे. यामध्ये पहिल्या फेरीत अंदाजे ३५०० मतांचे लीड असल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत घोषणा लवकरच निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे करणार आहेत.

या निवडणूकीत एकूण १९४३० पैकी १५३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणूकांची मतमोजणी सोलापूरात होटगी रस्त्यावर सिध्देश्वर मंगल कार्यालयात सकाळी सुरु झाली. मतमोजणीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. प्रथम मतांच वर्गीकरण करण्यात आलं. पहिल्या फेरीत अंबेचिंचोली पुळूज, फुलचिंचोली, शंकरगांव, विटे, उचेठाण, ब्रम्हपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनूर, पाटकूळ, वरकुटे, तांबोळे, तारापूर, मगरवाडी, या भागातील मतमोजणी सुरु झाली आहे.

 

दुपारी १ च्या सुमारास पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये खासदार धनंजय महाडीक यांच्या भिमा परिवार पॅनलचे उमेदवार जवळपास ३५०० मतांनी आघाडीवर आहेत. सायंकाळी ५ वाजता निकालाचं चित्र नक्की कोणाच्या बाजूनं हे स्पष्ट होणार आहे. अद्याप दोन्ही गट आम्हीच विजय होणार, असा दावा करत आहेत.

 

 

● या नेत्यांची लागली होती प्रतिष्ठा पणाला

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, भाजप सहयोगी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील,भाजप आमदार समाधान अवताडे, विठ्ठलचे कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, माजी उपसभापती तानाजी माने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर, चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे,जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #decided #Pandharpur #Mohol #talukas #transformed #mp #DhananjayaMahadeek #Bhima #Sugar #Factory, #ठरवलं #पंढरपूर #मोहोळ #तालुका #परिवर्तन #खासदार #धनंजयमहाडीक #राजनपाटील #प्रशांतपरिचारक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मला भारत जोडोचे निमंत्रण मिळाले नाही : अजित पवार
Next Article श्रद्धाचे 35 तुकडे प्रकरण – ‘लव्ह जिहाद’ च्या अँगलनेदेखील तपास करावा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?