Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लातूरमधील अधिकाऱ्याच्या पत्नीची सोलापूरच्या हॉटेलमध्ये आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

लातूरमधील अधिकाऱ्याच्या पत्नीची सोलापूरच्या हॉटेलमध्ये आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/11/28 at 4:38 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ मुलाच्या विवाहाचा बस्ता बांधायला आले होते सोलापूरलास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ मुलाच्या विवाहाचा बस्ता बांधायला आले होते सोलापूरला

 

सोलापूर : लातूर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी स्नेहलता प्रभू जाधव यांनी आत्महत्या केली आहे. सोलापुरातील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेतला आहे. Latur officer’s wife commits suicide in Solapur hotel Jadhav

स्नेहलता यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न आहे. यासाठी ते दोघे नवरा-बायको कर्नाटकातील चडचण येथे खरेदीसाठी गेले होते. दरम्यान सोलापूर येथील हॉटेलमध्ये आल्यावर सकाळी त्यांनी आत्महहत्या केली आहे. सोलापूरच्या निशा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.

या दरम्यान स्नेहलता जाधव यांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. स्नेहलता यांचा फोन येताच त्यांचे नातेवाई वीस ते पंचवीस मिनिटात हॉटेलच्या रुमवर पोहोचले मात्र, तोवर स्नेहलता यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मुलाच्या विवाहाचा बस्ता बांधायला लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापुरात आले होते. ते चडचण (कर्नाटक) येथे कपडे खरेदीसाठी जाणार होते. पण रविवारी (ता. 27) दुपारी अडीचच्या सुमारास जाधव यांची पत्नी स्नेहलता (सुनीता) जाधव (वय-४५) यांनी अचानक विजयपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.

दरम्यान,प्रभू जाधव यांच्या मुलाचा ११ डिसेंबर रोजी विवाह होता.त्यासाठी चडचण येथून ते कपडे खरेदी करायला सोलापुरात आले होते.जाधव यांच्या पत्नीचे माहेर सोलापूरच आहे. कपडे खरेदी करून काहीवेळात जाण्याच्या नियोजनात त्यांनी विजयपूर रोडवरील सोरेगाव परिसरातील निशा हॉटेलमध्ये स्वतंत्र रूम भाड्याने घेतली होती.

दरम्यान, कामानिमित्त जाधव हे अचानक लातूरला परतले. त्यांची पत्नी स्नेहलता (सुनीता) एकट्याच त्या हॉटेलमध्ये होत्या.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी भावाला कॉल करून आपण गळफास घेऊन आत्महत्या करतेय,असे सांगितले होते.भाऊ समजावून सांगत असताना सुनीता यांनी कॉल बंद केला. त्यानंतर त्यांच्या भावाने नातेवाइकांना सांगून त्या ठिकाणी जायला सांगितले.

पण, नातेवाईक येईपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर नातेवाइकांनी बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी गळफास घेतलेल्या सुनीता यांना बेशुद्धावस्थेत दवाखान्यात नेले. मात्र,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भातील माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांनी दिली. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून,पोलिस तपास करीत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Latur #officer's #wife #commits #suicide #Solapur #hotel #Jadhav, #लातूर #अधिकारी #पत्नी #सोलापूर #हॉटेल #आत्महत्या #जाधव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विठ्ठल मंदिर दिसणार मुळ स्वरुपात; पाच टप्प्यात होणार काम, मुंबईत विशेष बैठक
Next Article Lavani artist Meena Deshmukh सोलापूर । फॉर्म्युनर कार कालव्यात कोसळली; लावणी कलावंत मीना देशमुखांचे निधन

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?