Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कमी किमतीत वाहन देण्याचे आमिष दाखवून सोलापूरसह गुलबर्गा, मुंबईत फसवणूक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

कमी किमतीत वाहन देण्याचे आमिष दाखवून सोलापूरसह गुलबर्गा, मुंबईत फसवणूक

Surajya Digital
Last updated: 2022/11/30 at 12:55 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ फसवणुकीचे तब्बल आठ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक

सोलापूर : दोन वर्षांपासून फसवणुकीच्या तब्बल आठ गुन्ह्यातील आरोपीला शहर गुन्हे शाखेला अटक करण्यात यश आले आहे. कमी किमतीत वाहन देण्याचे आमीष दाखवून फसवल्याचे असे आठ गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत. Concealing fraudulent identity in Solapur including Gulbarga, Mumbai by luring vehicles at low prices

Contents
□ फसवणुकीचे तब्बल आठ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटकस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ स्वतःची ओळख लपवून मुंबईत राहायचा मुल्ला

शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील ई-स्क्वेअर जुनी मिल कंपाऊंड आवारातील ऑटो ए वन नावाच्या ऑफिसचा मालक महमद खाजापाशा महमद खासीम मुल्ला याने शोरूम किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये दुचाकी व चार चाकी वाहने विक्री करतो, असे नागरिकांना सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन नागरिकांना वाहने व घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली होती.

याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वरील संशयित आरोपी हा मिळून येत नसल्याने तो गुलबर्गा व मुंबई येथे स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी व सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान गुन्हे शाखेकडे नियुक्त पथकातील अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील अंमलदार यांना मुल्ला हा सोलापूर रेल्वे परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकातील पोलिसांनी सापळा लावून रेल्वे स्टेशन पोर्टल चाळ येथून मुल्ला याला ताब्यात घेतले.

त्यावेळी त्याच्या कब्जात एक एप्पल कंपनीचा लॅपटॉप मिळून आला. तसे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केले असता त्याने आपले नाव महमद खाजा पाशा महमद कासीम मुल्ला (वय-३२,रा. सध्या- आनंद सर्कल जोगेश्वरी वेस्ट मुंबई) असे सांगितले. मुल्ला याच्याकडून शोरूम पेक्षा कमी किमतीत वाहने विक्री करतो म्हणून प्राथमिक तपासात ३९ लाख २७ हजाराची फसवणूक केल्याचे त्याने सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

ही फसवणूक पुणे, मुंबई, बिदर, हुबळी, गुलबर्गा येथील नागरिकांची विविध कारणाने फसवणूक केली असल्याचे तपासात सांगितले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

 

□ स्वतःची ओळख लपवून मुंबईत राहायचा मुल्ला

 

कमी किंमतीत गाड्या देतो असे म्हणून लोकांना फसवणारा व फसवणुकीचे तब्बल आठ गुन्हे दाखल असणारा महमद खाजापाशा महमद कासीम मुल्ला हा स्वतःची ओळख लपवून मुंबई येथे मुद्यसर शेख या नावाने राहत होता. त्याने सोलापूर शहरात १५० गाड्या विकल्या असल्याचे सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र अशा तीन राज्यात देखील मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो बहिणीच्या बँकेचा अकाउंट व लोकांचे सिम कार्डचा वापर करत होता.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Concealing #fraudulent #identity #Solapur #Gulbarga #Mumbai #byluring #vehicles #lowprices, #कमी #किमतीत #वाहन #आमिष #दाखवून #सोलापूर #गुलबर्गा #मुंबईत #फसवणूक #ओळख #लपवून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्रद्धा वालकर हत्याकांड : ‘फाशी दिल्यास स्वर्गात अप्सरा मिळेल’
Next Article सोलापुरात संघर्ष : चिमणी हटाव विरुध्द चिमणी बचाव

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?