Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुळजापूर तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या नकाशावर झळकणार; 452 कोटींचा निधी मंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

तुळजापूर तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या नकाशावर झळकणार; 452 कोटींचा निधी मंजूर

Surajya Digital
Last updated: 2022/11/30 at 6:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ सोलापूर – तळजापूर- उस्मानाबाद रेल्वेसाठी ४५२ कोटींचा निधी मंजूर

उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी (ता. 29 ) झालेल्या बैठकीत सोलापूर तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ४५२ कोटी ४६ लाख रुपये मंजूर केले. यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. Tuljapur pilgrimage will now be visible on the railway map; 452 Crore Fund Sanctioned Osmanabad Dharashiv Solapur

Contents
□ सोलापूर – तळजापूर- उस्मानाबाद रेल्वेसाठी ४५२ कोटींचा निधी मंजूरस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेने जोडले जावे ही मागणी गेल्या ४ दशकांपासूनची होती. ती आता सत्यात उतरताना दिसतेय. यापूर्वी सोलापूर तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. या रेल्वेसाठी तुळजापूर तालुक्यातील काही गावातील जमिनींचे अधिग्रहण करण्याचे काम सुरू होते. फक्त निधीमुळे या रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरू होते. आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत ४५२ कोटी ४६ लाख रुपये निधी मंजूर केल्यामुळे या रेल्वे मार्गाला आता गती येणार आहे.

 

भविष्यात भाविक तुळजा भवानीच्या दर्शनाला रेल्वेने दाखल होतील. तसेच या रेल्वे मार्गामुळे व्यापार आणि उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होईल. सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचे ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

या प्रकल्पासाठी ९०४ कोटी ९२ लाख इतका खर्च येणार असून ५० टक्के सहभाग राज्य शासनाचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थानिक व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मात्र रेल्वेची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते म्हणून विविध लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून ही मागणी केलेली होती. या रेल्वे मार्गाची लांबी ८४.४४ किमी असून यावर १० रेल्वे स्थानके असतील तसेच ४ वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या ८४ किमीच्या रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळाली आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बजेट सादर केले. यामध्ये सोलापूर – उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी १० कोटी रुपये मिळाल्याने रेल्वेच्या कामास गती मिळत आहे.

उस्मानाबाद येथून जमीन मोजणीचे कामास सुरूवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत अशा तीन शहरांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर – उस्मानाबाद मार्ग ओळखला जाणार आहे.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #Tuljapur #pilgrimage #now #visible #railway #map #Crore #Fund #Sanctioned #Osmanabad #Dharashiv #Solapur, #तुळजापूर #तीर्थक्षेत्र #रेल्वे #नकाशा #झळकणार #कोटी #निधी #मंजूर #सोलापूर #उस्मानाबाद #धाराशिव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुकाराम मुंढे… कार्यमुक्त व्हा… शिंदे सरकारचा फतवा; पुढील आदेशाची वाट पाहा
Next Article पंढरपूर पत्नीला औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?