Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी : एमपीएससीच्या दोन परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात पास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी : एमपीएससीच्या दोन परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात पास

Surajya Digital
Last updated: 2022/12/01 at 10:51 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● वडिलांचे अधूरे स्वप्न लेकीने केले पूर्णस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● शेतकऱ्यांची एवढी थट्टा करु नका रे ?

● वडिलांचे अधूरे स्वप्न लेकीने केले पूर्ण

सोलापूर : सोलापुरातील शेतकऱ्याच्या लेकीने उत्तुंग भरारी मारली आहे. एमपीएससीच्या दोन परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात पास होऊन वडिलांचे अधूरे स्वप्न या लेकीने पूर्ण केले आहे. Farmer’s daughter’s success: Two MPSC exams, pass in first attempt Solapur Madha

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे अधिकाऱ्यांचे आणि बुद्धिवंतांचे गाव म्हणून सर्वत्र ओळखलं जाते. या गावातील १५०० लोक विविध सरकारी पदावर कार्यरत आहेत. याच गावातील दुग्ध व्यवसायिक आणि शेतकरी असणाऱ्या हनुमंत डुचाळ यांची कन्या धनश्री डुचाळ हीने विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही परीक्षेत एकाच वेळी घवघवीत यश मिळवत आपल्या वडिलांचे अधिकारी होण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न लेकीने साकार केले आहे.

धनश्रीचे आई वडील हे दोघेही शेतकरी असून शेतीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. धनश्रीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण नंदीकेश्वर विद्यालयात झाले. तर पदवीचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे आणि पदवीत्तर शिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथून पुर्ण केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

तिने चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. वडील हनुमंत डुचाळ यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु परिस्थिती नाजूक असल्याने ते त्यांना शक्य झाले नव्हते. परंतु लेकीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परिक्षेत घवघवीत यश मिळवून वडिलांचे अधूरे राहिलेले स्वप्न साकार केल्याने तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

आई, वडिलांनी काबाडकष्ट करून मला शिक्षणासाठी मोठे बळ दिले. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द मनात ठेवून अभ्यास केला तर गावातील आयएएस रोहिणी भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे, डॉ. अश्विनी वाकडे, आयएएस स्वप्नील पाटील, तहसीलदार अमरदिप वाकडे, आरटीओ श्रीकृष्ण नकाते यांचे सतत मोलाचे मार्गदर्शन लाभले.. या सर्वांच्या पाठबळावरच मला हे यश मिळाले असल्याचे धनश्री डुचाळ यांनी सांगितले.

 

● शेतकऱ्यांची एवढी थट्टा करु नका रे ?

 

सोशल मीडियावर एक पावती व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका शेतकऱ्याला 205 किलो कांदा विकल्यानंतर फक्त 8.36 रुपये मिळाले. व्हायरल होत असलेली ही पावती कर्नाटकातील एका शेतकऱ्याची आहे, ज्याने कांदा विकण्यासाठी 415 किमीचा प्रवास करून यशवंतपूर (बंगळुरू) गाठले. येथे त्याला ₹200 / क्विंटल या दराने एकूण ₹410 मिळणार होते, पण व्यापाऱ्याने मजुरी ₹24 व मालवाहतुकीसाठी ₹377.64 कापून शेतकऱ्याला फक्त ₹8.36 दिले.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Farmer's #daughter's #success #Two #MPSC #exams #pass #first #attempt #Solapur #Madha, #शेतकरी #लेक #उत्तुंग #भरारी #एमपीएससी #दोन #परीक्षा #पहिल्याच #प्रयत्न #पास #सोलापूर #माढा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर पत्नीला औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
Next Article डॉक्टर लॉबी जिंकली, तुकाराम मुंढे हरले

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?