● महाराष्ट्रातील १३ लाख विद्यार्थ्यांना फटका ; आता फक्त ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांनाच स्कॉलरशीप
मुंबई : इयत्ता पहिली ते आठवी मोफत शिक्षण दिले जाते, असे सांगत मुस्लिम, शिख, पारशी, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती मोदी सरकारने अचानक बंद केली आहे. Modi govt closed scholarships for minorities
या योजने अंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. प्रती महिना २२५ रुपये तर वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रती महिना ५२५ रुपये वर्षातून १० महिने दिले जात होते. पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सर्वसाधारण विद्यार्थ्याला वार्षिक ७५० रुपये तर वसतिगृहातील विद्यार्थ्याला वार्षिक १००० रुपये दिले जात होते.
दरम्यान पहिली ते आठवीतील विद्यार्थी हे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत येत असल्याने त्यांना सरकारकडून आधीपासून मोफत शिक्षण पुरवण्यात येते, असे सांगत मोदी सरकारने ही शिष्यवृत्ती बंद केली आहे. ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनाच फक्त प्री-मॅट्रिक स्कॉलरशीप देण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.
सरकारने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले पण आता ही शिष्यवृत्तीच बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १३ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकार जर ही शिष्यवृत्ती देत नसेल तर राज्य सरकारने या शिष्यवृत्तीसाठी तरतूद करून शिष्यवृत्ती द्यावी.
शिष्यवृत्ती प्रश्नी काँग्रेस पक्ष हिवाळी अधिवेशनात आवाज उठवेल, असे पटोले यांनी सांगितले. मोदी सरकारने मुस्लिम, शिख, पारशी, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याने हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 भारत जोडो यात्रा : स्वरा भास्करने राहुल गांधींना दिला गुलाब
नवी दिल्ली : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. या यात्रेत अनेक अभिनेते व अभिनेत्री देखील सहभागी झाले आहेत. आज या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर ही देखील सहभागी झाली होती. यासाठी ती खास उज्जैनला गेली होती. यावेळी ती एकदम साध्या पोशाखात होती. सोशल मीडियावर याचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान स्वरा राहुल गांधींना गुलाबाचे फुल देतानाचा फोटो देखील समोर आला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला 83 दिवस पूर्ण झाले आहेत. ही यात्रा मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पोहोचली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही देखील आज (1 डिसेंबर) ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी झाली आहे. या यात्रेला महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशातही चांगला प्रतिसाद मिळला आहे.
भारत जोडो यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासोबत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, दिग्वीजय सिंह, माजी खासदार प्रमचंद गड्डू, माहिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शोभा ओझा यांनीही सहभाग घेतला होता. तसेच भारत जोडो यात्रेत सुरु करण्यात आलेल्या वाचनालयात पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावरील पुस्तके नागरिकांना वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
देशातील सत्ताधारी भाजपा आघाडीची मोट बांधण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना अन्यायाविरोधात एकत्रित करण्यासाठी राहुल गांधींनी देशभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. भारत जोडो यात्रेत राजकीय नेत्यांसह आता बॉलिवूड कलाकारही सहभागी होताना दिसत आहेत. गुरुवारी या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती. या यात्रेनंतर स्वरा भास्करने “या यात्रेची ताकद, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेम प्रेरणा देणारे आहे. दिवसेंदिवस मिळणारा लोकांचा उदंड प्रतिसाद, कॉंग्रेस नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांचा उत्साह या भारता जोडो यात्रेच्या निमित्ताने यला मिळाला”, असे म्हटले.
“भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली. या यात्रेची ताकद, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेम प्रेरणा देणारे आहे. दिवसेंदिवस मिळणारा लोकांचा उदंड प्रतिसाद, कॉंग्रेस नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांचा उत्साह या भारता जोडो यात्रेच्या निमित्ताने यला मिळाला. राहुल गांधी यांना मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि त्यांच्या मनात लोकांप्रती असणारे प्रेम अप्रतिम आहे. जेव्हा समाजात क्रुरपणे भयंकर गुन्हे घडतात, त्यावेळी अनेकदा अशा गंभीर गोष्टींकडे दर्लक्ष केले जाते. पण भारत जोडो यात्रा ही आशेचा किरण आहे. या यात्रेच्या माध्यमातून नफरतीचा प्रतिकार करणे शक्य होईल”, असे स्वरा भास्करने म्हटले.
भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना फावल्या वेळेत वाचनासाठी मोबाईल लायब्ररी (फिरते वाचनालय) सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयात इतिहासाशी संबंधित आणि राजकारणाची माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.
अभिनेत्रीचे राहुल गांधीसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. याआधी पूजा भट्ट, रिया सेन आणि रश्मी देसाई या अभिनेत्रीही राहुल गांधींसोबत देशाच्या विविध भागात फिरताना दिसल्या होत्या.
स्वरा भास्करने सलवार सूट घातला होता, तर राहुल गांधींनी पांढरा टी-शर्ट घातला होता. याआधी स्वराने गुरुवारी वॉक करण्यापूर्वी उज्जैनला पोहोचल्याचे फोटो रिट्विट केले होते. ती लोकांच्या गर्दीसमोरून चालत गेली आणि राजकारण्यांच्या सुरक्षा पथकाने तिला घेरले. सोशल मीडियावरील तिच्या व्हिडिओ आणि चित्रांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, काहींनी भारत जोडो यात्रेत सामील झाल्याबद्दल आणि पक्ष आणि नेत्याला पाठिंबा दर्शवल्याबद्दल अभिनेत्रीचे कौतुक केले.
ही यात्रा 4 डिसेंबरला राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 12 दिवसांत पश्चिम मध्य प्रदेशातील माळवा-निमार भागात 380 किलोमीटरचे अंतर पार करेल. मध्य प्रदेशात ही यात्रा आतापर्यंत बुरहानपूर, खंडवा, खरगोन आणि इंदूर जिल्ह्यातून गेली आहे. भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली.